AU Slams again Voter List Chaos – मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना मतदारयादीतील त्रुटींवरून राजकीय वातावरण तापले आहे.
मतदारयादी डाउनलोडपासून संभाव्य दुबार नावे, मृत मतदारांची नोंद आणि बीएलओंच्या निष्क्रियतेपर्यंत अनेक अनियमितता संदर्भात उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत आरोप केले.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला.
आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की,पहिल्या दिवशी मतदारयादी डाउनलोड होत नव्हती, ती मशीन-रीडेबल स्वरूपातही उपलब्ध नव्हती. विभागवार यादीत नावे शोधता येत नव्हती. नागरिकांना स्वतःचे नाव, इमारतीचे नाव, विभाग शोधताना प्रचंड अडचण आली. यासंदर्भात निवडणूक आयोगाची भेट घेऊनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
गेल्या दहा–बारा दिवसांपासून आम्ही स्वतःच प्रत्येक शाखा, विधानसभा क्षेत्रात जाऊन हरकती प्रक्रिया पूर्ण करत आहोत.प्रत्येक वॉर्डमध्ये तीन ते चार हजार आक्षेप नोंदवले जात आहेत. ही प्रणाली अतिशय किचकट आणि वेळखाऊ आहे.
ते पुढे म्हणाले की संभाव्य दुबार यादीत मोठ्या प्रमाणात मराठी मतदारांची नावे तसेच विरोधी पक्षातील कार्यकर्ते आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधींची नावे आहेत. आमदार सुनील शिंदे यांचे नाव आठ वेळा आहे.
माजी महापौर श्रद्धा जाधव, धारावीच्या आमदार ज्योती गायकवाड, खासदार अनिल देसाई यांचीसुद्धा नावे दुबार आहेत. मतदानाच्या दिवशी संभाव्य दुबार ओळख असलेल्या मतदारांना परिशिष्ट-२ भरावे लागणार आहे. त्यामुळे मतदानाचा वेग कमी होण्याचा धोका आहे. हा विरोधी पक्षाचे मतदार किंवा सामान्य मुंबईकर यांना मतदानापासून परावृत्त करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न आहे का?
बीएलओ म्हणून असे लोक पाठवले जात आहेत ज्यांना वाचता-लिहिता येत नाही. एवढ्या महत्त्वाच्या कामात असा बेजबाबदारपणा म्हणजे निवडणूक प्रक्रियेची थट्टा आहे. लोकसभेत आणि विधानसभेत आम्ही दिलेल्या अनेक मृत मतदारांची नावे कायम आहेत. बूथनिहाय चार–पाच मृत मतदारांनी मतदान केल्याची उदाहरणे आमच्याकडे आहेत.
ही सरळ वोट चोरी आहे. मुंबईतील २२७ वॉर्डांमध्ये सुमारे ५ लाख ८६ हजार युनिक मतदारांची नावे दुबार-तिबार स्वरूपात आढळले. एकूण १४ लाख नोंदी संभाव्य दुबार दाखवले आहेत. काही प्रत्यक्ष दुबार नावे यादीत असूनही त्यांच्या नावासमोर स्टार नाही. हा आळशीपणा आहे की नियोजनबद्ध कारस्थान आहे हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे.
हे देखील वाचा –
संसदेचे कामकाज सलग दुसऱ्या दिवशी तहकूब
Virat Kohli Vs Gautam Gambhir : विराट – गंभीरमध्ये पुन्हा वादाची ठिणगी?
बीडमध्ये राष्ट्रवादी-भाजप गटात तुफान राडा..









