Azmi’s controversy over Marathi – समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party)आमदार अबू आझमी (MLA Abu Azmi) यांच्या विधानामुळे भिवंडीत (Bhiwandi) पुन्हा एकदा मराठी-हिंदी वादाला तोंड फुटले आहे.
भिवंडीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी आझमींना मराठीत प्रतिक्रिया देण्याची विनंती केली. त्यावेळी ते म्हणाले की, मराठी आणि हिंदीमध्ये फरक काय आहे? मी मराठीही बोलू शकतो, पण मला त्याची गरज काय आहे?
हे भिवंडी आहे, इथे मराठीची गरज काय? दिल्लीमध्ये गेलात तर मराठी कुणाला कळणार नाही. मी उत्तर प्रदेशात जाऊन मराठी बोललो, तर माझे बोलणे कुणी ऐकणार नाही.
आझमी यांच्या विधानाचा मनसेने जोरदार समाचार घेतला. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी म्हणाले की, अबू आझमी तुम्ही महाराष्ट्रात राजकारण करता. इथे राजकारण करताना तुम्हाला उत्तर प्रदेशातील भैय्याची पर्वा आहे का?
भिवंडी महाराष्ट्रात आहे, इथे मराठीच चालणार. तुम्हाला मराठी बोलायला लाज वाटत असेल, तर मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल.
आझमींच्या या विधानावर भाजपा नेत्या नवनीत राणा यांनीही संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, ज्यांना मराठी भाषा आवडत नाही, त्यांनी महाराष्ट्र सोडणे योग्य राहील.
हे देखील वाचा –
आशिया कप ट्रॉफीवरून मोठा वाद! BCCI च्या पदाधिकाऱ्यांचा ACC बैठकीतून ‘वॉकआऊट
जागतिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सज्ज
जिकडे तिकडे ‘या’ भारतीय ॲपचीच चर्चा; WhatsApp पेक्षाही मिळतात खास फीचर्स