Home / News / बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण २८ व्या आरोपीला अटक

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण २८ व्या आरोपीला अटक

Baba Siddique Murder Case: 28th Accused Arrested

Baba Siddique Murder Case: 28th Accused Arrested

28th Arrest in Baba Siddique Murder माजी मंत्री बाबा सिद्दीकी (former minister Baba Siddique murder)यांच्या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमोल गायकवाड (Amol Gaikwad)या आरोपीला कोल्हापूरहून(Kolhapur) अटक केली आहे. या प्रकरणातील हा २८ वा अटक आरोपी आहे. १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या(Bishnoi’s gang) टोळीने घेतली होती.

तपासात अमोल गायकवाडचा पंजाबमधील (Panjab)एका कापड व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटाबाबत झालेल्या बैठकीतही त्याची उपस्थिती असल्याचे समोर आले आहे.

हत्यानंतर अमोल गायकवाड इतर फरार आरोपींच्या विशेषतः पुण्यातील मुख्य आरोपी लोणकरच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटकेनंतर अमोलला न्यायालयात हजर केले असता त्याला ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

बिहार मतदार नोंदणी मुदतवाढ देण्यावर १ सप्टेंबरला सुनावणी

जरांगे यांचा राजकीय अजेंडा अजित पवार गटांची साथ ! लक्ष्मण हाकेंचा आरोप

फडणवीस एक जातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत: राऊतांचा आरोप