Bail Plea of Datta Gade Rejected Again in Swargate Case
Swargate Datta Gade’s Bail Rejected – पुणे शहरातील स्वारगेट (Swargate rape case)अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपी दत्ता गाडे याचा दुसरा जामीन अर्जही पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला.(Court rejected the bail)
याप्रकरणी सुनावणीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी दिलेल्या सात पानी आदेशात म्हटले आहे की, आरोपीवर महिलेविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, परिस्थितीतील कोणताही बदल न झाल्याने त्याला जामिनावर सोडणे शक्य नाही. याशिवाय त्याच्यावर याआधी चोरी, दरोडा आणि चेन स्नॅचिंगसह सहा गुन्हे दाखल आहेत. पुढील टप्प्यात आरोप निश्चितीसाठी सुनावणी सुरू होणार आहे. आरोपीला पुढील तारखेस न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसार व पीडितेच्या वकील अॅड. श्रीया आवले यांनीही जोरदार युक्तिवाद करत आरोपीच्या जामिनाला विरोध केला होता. तर गाडेच्या वकिलांनी या घटनेबाबत सहमतीने संबंध झाल्याचा दावा केला होता. मात्र डीएनए व फॉरेन्सिक पुराव्यांनी त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.
काही महिन्यांपूर्वी स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही(Shivshahi bus) बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी गाडे याला शिरूर तालुक्यातून अटक केली. त्याच्याविरुद्ध तब्बल ८९३ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले. तो सध्या येरवडा कारागृहात कोठडीत आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
8,500 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेले शहर सापडले; आजही सर्व वस्तू सुरक्षित
प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Health Tips: केवळ व्यायाम आणि आहारच नाही! हृदयविकाराला कारणीभूत आहेत ‘हे’ 6 दुर्लक्षित घटक