Home / News / शनिवार वाडा परिसरातील रहिवाशांचे घंटानाद आंदोलन

शनिवार वाडा परिसरातील रहिवाशांचे घंटानाद आंदोलन

Bell-ringing protest by residents of Shaniwar Wada पुणे – पुण्यातील शनिवार वाडा परिसर हेरिटेज ग्रस्त समितीने आज प्रशासनाच्या विरोधात घंटानाद...

By: Team Navakal
Bell-ringing protest by residents of Shaniwar Wada area

Bell-ringing protest by residents of Shaniwar Wada

पुणे – पुण्यातील शनिवार वाडा परिसर हेरिटेज ग्रस्त समितीने आज प्रशासनाच्या विरोधात घंटानाद आंदोलन केले. शनिवार वाड्याच्या १०० मीटर परिघात बांधकामाला परवानगी द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. Pune heritage shaniwar wada

२००३ सालच्या कायद्यानुसार ऐतिहासिक वास्तूंच्या १०० मीटर परिघात बांधकामास मनाई आहे. मात्र या परिसरातील रहिवाशांनी या नियमात शिथिलता द्यावी अशी मागणी केली आहे. लाल महालासमोरील जुन्या चाळींमध्ये ६४ कुटुंबे राहतात. ऐतिहासिक वास्तुच्या परिसरात राहणे हा आमचा गुन्हा आहे का ? असा सवाल आंदोलकांनी केला. resident protest

यावेळी आंदोलक म्हणाले की, १०० मीटर परिघात बांधकामास मनाई आहे. या नियमात शिथिलता द्यावी. पेशवेकाळापासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना स्वतःची घरे बांधण्यासाठी मदत हवी आहे. लाल महालासमोरील आमची चाळ आहे. त्याठिकाणी ६४ कुटुंबे राहतात. आमची मागणी आहे की आम्हाला बांधकामाची परवानगी देण्यात यावी. आम्ही अनेकदा निवेदन दिले पण अजून प्रशासन प्रतिसाद देत नाही. आम्हाला न्याय द्या आश्वासन नको.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या