महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग!भाजपा नेत्याला अटक

BJP Leader Arrested for Molesting Woman Police Inspector

BJP Leader Arrested for Molesting Woman Police Inspector

पुणे – पुण्यात भाजपाचे (BJP) शहर महामंत्री प्रमोद कोंढरे यांना एका महिला पोलीस निरीक्षकाचा (Molesting) विनयभंग केल्याप्रकरणी अटक (Arrest) केली आहे. त्यांच्याविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दल विनयभंगांचा गुन्हा नोंद झाला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नियोजित पुणे दौऱ्यानिमित्त भाजपाचे नेते शनिवार वाड्याजवळ जमले होते. त्यावेळी भाजपाचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांना आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना एका दुकानात चहा पिण्यासाठी घेऊन गेले. त्यावेळी प्रमोद कोंढरे यांनी गर्दीचा फायदा घेऊन महिला पोलीस निरिक्षकाला दोन वेळा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केला. संबंधित महिला पोलीस अधिकार्‍याने हा प्रकार वरिष्ठांना सांगितला. त्यानंतर त्या चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये कोंढरे यांनी महिला अधिकाऱ्याला पाठीमागून धक्का दिल्याचे आढळले. हे प्रकरण पूर्ण पारदर्शकतेने आणि कायद्यानुसार हाताळले जाईल, असे आश्वासन तपास अधिकाऱ्याने दिले.
कोंढरे यांनी पत्रक काढून त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याला माझा कुठल्याही प्रकाराचा धक्का लागलेला नाही. गैरसमजूतीतून हा प्रकार घडल्याचे सांगितले. याशिवाय सत्य परेशान हो सकता है, पराजित नही अशी पोस्ट त्यांनी समाज माध्यमावर केली. कोंढरे यांच्यावर याआधीही विनयभंगाचा गुन्हा नोंद असल्याची माहिती आहे.

भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष चित्र वाघ यांनी एक्स द्वारे कोंढारे यांना पदमुक्त केल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, यासंदर्भात मी पुण्याचे भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडून माहिती घेतली. त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्याला तत्काळ पदमुक्त केल्याचे सांगितले.