भाजपा आमदाराचा शिंदेंच्या मंत्र्यांशी निधीवाटपावरून वाद

BJP MLA clashes with Shinde’s ministers over fund allocation.

BJP MLA clashes with Shinde’s ministers over fund allocation.

मुंबई – भाजपाचे आमदार विनोद अग्रवाल आणि शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले(BJP & Shinde) यांच्यात आज विधानभवन परिसरात निधीवाटपावरून(mahayuti dispuit) वाद झाला. आमदार अग्रवाल यांनी आपल्या मतदारसंघाला रोजगार हमी योजनेचा निधी न मिळाल्याची तक्रार गोगावले यांच्याकडे केली. विशेष म्हणजे, आतापर्यंत शिंदे गाटाच्या मंत्र्‍यांनी आपल्या खात्यांना निधी मिळत नसल्याचा आरोप केला जातो. पण यावेळी भाजपाच्या आमदारानेच(shinde group) शिंदे गटाच्या मंत्र्यावर निधी देत नसल्याची तक्रार केली.

विनोद अग्रवाल(MLA) म्हणाले की, रोजगार हमीचे पैसे अजून आले नाहीत. रोजगार हमी योजनामध्ये संपूर्ण राज्यामध्ये ४१८५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात निधीवाटप केले गेले. पण(Gondiya) गोंदिया जिल्ह्याला रोजगार हमी योजनेचा एकही रुपया मिळाला नाही. माझ्या मतदारसंघात रोजगार हमी योजना, कुशल निधी आणि विकास कामाचा निधी मार्च २०२५ पर्यंत आला पाहिजे होता . तो अजून आला नाही. मराठवाड्यात ७० ते ८० टक्के निधी मिळाला आहे. बाकींना निधी कधी मिळणार? जाणूनबुजून गोंदिया जिल्ह्याला दुर्लक्षित केले जात आहे. यापूर्वीही मी ३ वेळा मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन निधीवाटपाचा विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. अजून कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज मी पुन्हा त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही तक्रार केली आहे.