BJP MP Dubey Says: You Survive on Our Money
मुंबई – मराठी भाषिक आमच्या पैशांवर जगतात. असे वादग्रस्त विधान भाजपाचे (BJP MP Dubey statement)झारखंडच्या गोड्डा मतदारसंघाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केले. राज्यात मराठी आणि अमराठी भाषावादामुळे तणाव सुरु आहे. मुंबईतील मीरा रोड परिसरात एक व्यापारी मराठीत बोलला नाही, म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी त्याला केलेली मारहाण, ५ जुलैला ठाकरे बंधूनी १९ वर्षानंतर एका व्यासपीठावर येत मराठी भाषिकांसाठी घेतलेली भूमिका यामुळे वातावरण तापलेले आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष विरुद्ध सत्ताधारी भाजपा, उत्तर भारतीय कलाकार, नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यासंदर्भात खासदार दुबे यांनी एक्सवर टीका करून उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टॅग केले. त्यांनी एक्सवर लिहिले की, हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्राही वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा.(Raj Thackeray controversy0
भाजपा खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, तुम्ही लोक आमच्या पैशावर जगत आहात. तुमच्याकडे कोणते उद्योगधंदे आहेत? जर तुम्ही हिंदी बोलणाऱ्यांना मारतात, हिंमत असेल तर मग उर्दू, तमिळ आणि तेलुगू बोलणाऱ्यांनाही मारा. आम्हा सर्वांना मराठी आणि महाराष्ट्रातील लोकांचा सन्मान आहे.(Uddhav Thackeray politics)
आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका असल्याने राज आणि उद्धव हे घाणेरडे राजकारण करत आहेत. जर खरोखरच हिंमत असेल तर माहिमला जाऊन माहिम दर्ग्याच्या समोर हिंदी किंवा उर्दू बोलणाऱ्याला मारून दाखवा.
महाराष्ट्रात टाटा, बिर्ला आणि रिलायन्स असेल. पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. बिहार, झारखंड नसते तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केले असते? तुमच्याकडे कारखाना नाही, उद्योग नाहीत किंवा खनिजाच्या खाणी नाहीत. सर्व खाणी झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि ओडिसात आहेत. रिलायन्सची रिफायनरी आणि सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रात काय आहे? तरीही आमचेच शोषण करुन दादागिरी करता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे फक्त उत्तर भारतीयांना लक्ष्य करत आहेत. तुम्हाला मारायचे असेल तर मग मुंबईतील तामिळी, तेलुगु आणि उर्दू सगळ्या भाषिकांना मारा. स्वत:च्या घरात सगळेच राजे असतात. राज आणि उद्धव ठाकरे यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशात येऊन दाखवावे. तिकडे त्यांना उचलून आपटतील. आम्ही मराठीचा सन्मान करतो पण ही हुकूमशाही खपवून घेणार नाही.(BMC elections 2025)
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar)म्हणाले की, खासदार निशिकांत दुबे यांना माझी विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रात बिहारसाठी निवडणूक रणनीती राबवण्याचा प्रयत्न करू नये. ते पश्चिम बंगाल आणि बिहार निवडणुकीचा विचार करत आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचवत आहे. त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषेविरुद्ध बोलणे चुकीचे आहे. जर तुम्ही महाराष्ट्र आणि मराठीविरुद्ध बोललात तर ते ऐकून घेतले जाणार नाही.
भाजपाच्या बुडाला आग लागली(UBT)
उद्धव ठाकरे विधानभवनात आलेले असताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी माणसांसोबत इतर भाषिक लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यांनी सुद्धा आमच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. भाजपाच्या बुडाला आग लागणे स्वाभाविक आहे. त्यांचे तोडा – फोडा आणि राज्य करण्याचे राजकारण आहे. लोकांच्या घराची होळी पेटवून त्यावर राजकारणाच्या पोळ्या शेकण्याचा भाजपाचा धंदा आता संपलेला आहे. निशिकांत दुबे यांनी स्वतःचे काम बघावे, त्यांना कोणी ओळखते का ? काड्या करणे हा काही लोकांचा उद्योग असतो.आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही , पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे .