BJP MP Nishikant Dubey has once again targeted the Thackeray family
मुंबई – गेले काही दिवस सातत्याने महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या विरोधात वक्तव्य करणारे, परराज्यांत गेल्यास ठाकरे बंधुंना लोक मारतील,असे म्हणून आगित तेल ओतणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey on Thackeray brothers)यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधुंना डिवचले .(Marathi language politics Mumbai
) मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीनंतर ठाकरे बंधुंचे राजकारण संपुष्टात येईल,अशा शब्दात दुबे यांनी उध्दव आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला.(Uddhav Thackeray politics end)
मुंबईत भाषेच्या आधारावर राजकारण करणे यापुढे चालणार नाही. मुंबईत मराठी भाषा बोलणारे(Marathi vs non-Marathi voters) अवघे २० टक्के लोक आहेत. येथे १२ टक्के मुस्लीम आहेत. ते त्यांची हिंदी बोलतात. तर ३० टक्के लोक प्रचलित हिंदी भाषा बोलतात.उर्वरित लोक त्यांच्या त्यांच्या भाषा बोलतात.त्यामुळे मुंबईवर मराठी भाषेची मक्तेदारी राहिलेली नाही. मुंबईला जे वैभव प्राप्त झाले आहे त्यात उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांचे मोठे योगदान आहे. आगामी महापालिका निवडणुकीत अमराठी मतदार ठाकरे बंधुंच्या विरोधात मतदान करणार. मुंबई महापालिका महायुतीच जिंकणार. त्यामुळे ठाकरे बंधुंचे राजकारण संपणार, असे दुबे म्हणाले.