BJP needs people in Mumbai, says MLA Jayant Patil
मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक mnc election जवळ आल्याने सर्व राजकीय पक्षांनी जोरात तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी ताज हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीवरून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी भाजपाला मुंबईत आणखीन लोकांची गरज आहे असा टोला लगावला आहे. NCP sharad pawar 
जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीची योग्य वेळी बैठक होईल. जशी वार्ड रचना होईल तसे तिन्ही पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील. भाजपाला मुंबईत आणखीन लोकांची गरज आहे असे चित्र आहे. त्यामुळे ते इतर पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधत आहेत. वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन भेटत आहे. मुंबई पालिकेच्या ९२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. या ठेवी आता रिकाम्या होऊ लागल्या आहेत. २ लाख ३६ कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर दिल्या आहेत मात्र यांच्याकडे द्यायला पैसा नाही .असलेल्या ठेवी मोडण्याची वेळ यांच्यावर आली आहे. आपल्या समोर मोठी आव्हाने आहेत. पक्ष फुटला पण मुंबईचे कार्यकर्ते कुठेच गेले नाही. २-४ टक्के माणसे फक्त इकडे तिकडे गेली आहेत.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








