Home / News / BMC Transfer Scam : महापालिकेतील बदली बढती घोटाळ्याची चौकशी करा! सुनील प्रभुंची मागणी

BMC Transfer Scam : महापालिकेतील बदली बढती घोटाळ्याची चौकशी करा! सुनील प्रभुंची मागणी

BMC Transfer Scam – मुंबई महापालिकेमध्ये दुय्यम अभियंता आणि सहाय्यक अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप होत आहे....

By: Team Navakal
BMC Transfer Scam

BMC Transfer Scam – मुंबई महापालिकेमध्ये दुय्यम अभियंता आणि सहाय्यक अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप होत आहे. त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या १५६ आदेशांना चार दिवसांपूर्वीच स्थगिती दिली.

या संदर्भात उबाठा आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आमदार प्रभू म्हणाले की, नगर अभियंता व संचालक यांना आयुक्तांच्या अखत्यारीत आणा सद्यस्थितीत प्रमुख अभियंता ५, उपप्रमुख अभियंता २४, कार्यकारी अभियंता १५०, सहायक अभियंता २००, दुय्यम अभियंता पदातील तब्बल ३०० पदे रिक्त आहेत.

आपण आवाज उठवल्यानंतर वर्षभरानंतर गट अ परीक्षेमधील पेपर फुटणे, परिणामी परीक्षा पुन्हा राबवण्यात येणे, बदलीला स्थगिती द्यावी लागणे नामुष्की येत असल्याने पालिकेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचत आहे. शिवाय मर्जितल्या अधिकार्यांना अतिरिक्त कारभार कुणाच्या मर्जीने दिला जातो याचाही तपास होणे गरजेचे आहे.

त्यामुळेच या गैरव्यवहाराची एसआयटीकडून चौकशी करून दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत अंतरिम कालावधीकरिता प्रमुख अभियंता (विकास नियोजन)च्या धर्तीवर नगर अभियंता व संचालक यांनाही पालिका आयुक्तांच्या अखत्यारीत देण्यात यावे, जेणेकरून चौकशी पारदर्शक होईल.

गुन्हे शाखेकडून तपास करा या बदली आणि बढत्यांत झालेल्या अनियमिततेची विशेष तपास पथकाकडून चौकशी करून दोषींवर कारवाई करा.


हे देखील वाचा – 

मेहुल चोक्सीला दिलासा नाही न्यायालयाने याचिका फेटाळली

आयुष – अ‍ॅलोपॅथी डॉक्टर समानता वरिष्ठ खंडपीठाकडे निर्णय वर्ग

राष्ट्रवादीतून ऑफर होती पण पक्षनिष्ठा ठेवली आणि भले झाले ! मोहोळांच्या विधानाने चर्चा

Web Title:
संबंधित बातम्या