Home / महाराष्ट्र / १४ वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

१४ वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) १४ वर्षांच्या बलात्कार पीडितेला abortion करण्याची परवानगी दिली. पीडिता २४ आठवड्यांची गर्भवती...

By: Team Navakal
Bombay High Court

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) १४ वर्षांच्या बलात्कार पीडितेला abortion करण्याची परवानगी दिली. पीडिता २४ आठवड्यांची गर्भवती ( 24th week of pregnancy)आहे. याप्रकरणी काल पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले की, जर अल्पवयीन मुलीची इच्छा असल्यास ती गर्भपात करू शकते.
रायगड जिल्ह्यात एका तरुणाने इन्स्टाग्रामवर एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली आणि नंतर तिचे लैंगिक शोषण केले. जेव्हा मुलीला सहा महिने मासिक पाळी न आल्याने मुलीच्या आईला संशय आला. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर गर्भधारणा झाल्याची पुष्टी झाली. आरोपी तरुणाविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत FIR दाखल केला. ६ जून रोजी उच्च न्यायालयाने रायगडमधील अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्जनला वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले. तपासणीनंतर मंडळाने सांगितले की पीडितेला रक्ताची कमतरता आहे आणि हिमोग्लोबिन पातळी सुधारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. कालच्या सुनावणीत वैद्यकीय मंडळाने न्यायालयाला सांगितले की आता पिडीत मुलगी शस्त्रक्रियेसाठी योग्य आहे. याशिवाय शस्त्रक्रियेनंतर भविष्यात तिच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होणार नाही.

Web Title:
संबंधित बातम्या