Budget of ₹14,619 Crore Proposed for 2027 Census
2027 Census ₹14,619 Cr Budget – आगामी २०२७ मध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रीय जनगणनेसाठी (national census)देशाच्या महालेखापाल कार्यालयाने आराखडा तयार केला आहे. सुमारे १४ हजार ६१८ कोटी ९५ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. ही जनगणना इलेक्ट्रॉनिक स्वरुपात केली जाणार असून त्यामध्ये जातनिहाय गणनाही (digital census)निश्चित केली जाणार आहे.
महालेखापाल कार्यालय केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येते. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला या कार्यालयाने जनगणनेसाठीच्या खर्चाचा प्रस्ताव अर्थ खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या व्यय समितीकडे (EFC) मंजुरीसाठी पाठविला आहे. ईएफसीची मंजुरी मिळाल्यानंतर गृह मंत्रालय हा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेट(Union Cabinet) मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवणार आहे.
ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी आणि नवीन नोंदणी केली जाईल. या टप्प्यात घरांची स्थिती, घरात असलेल्या आवश्यक सुविधा आणि संबंधित कुटुंबाच्या नावे असलेली मालमत्ता असा संपूर्ण तपशील नोंदवला जाणार आहे.
दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरू होईल. या टप्प्यात लडाख,(Ladakh) जम्मू आणि काश्मीर,(Jammu & Kashmir)हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड वगळता उर्वरित देशात लोकसंख्येची शिरगणती केली जाणार. लडाख, जम्मू आणि काश्मीर आणि उत्तराखंड येथे हे काम सप्टेंबर २०२६ मध्ये केले जाणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
सरकारचे २५० आमदार मात्र शरद पवार केंद्रस्थानी ! सुळेंचा भाजपाला टोला
स्टारलिंक आणि जिओला मोठी टक्कर! ॲमेझॉनचे ‘ही’ सेवा लवकरच भारतात सुरू होणार