Canteen Cleared, Setback for MLA Gaikwad – पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याचा आरोप करीत शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती.
त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हे कॅन्टीन चालविणाऱ्या अजिंठा केटरर्सचा कॅन्टीनचा परवाना निलंबित केला होता. मात्र अवघ्या महिनाभरातच अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई मागे घेत कॅन्टीनला क्लीनचिट दिली आहे.
जेवण उत्तमच होते हे स्पष्ट झाल्याने मारहाण करणारे आमदार गायकवाड यांना मोठा झटका बसला आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी शिळे अन्न दिल्याचा आरोप करत आमदार निवासातील अजिंठा केटरर्स या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणानंतर विधानसभेत आमदार निवासातील अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत चर्चा झाली होती.
विधानसभेच्या अध्यक्षांनी तातडीने चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानुसार एफडीएने तपासणी करत परवाना निलंबित केला होता. पण तपासणीनंतर त्यांनी या उपाहारगृहाला दिलासा दिला आहे. उपाहारगृहामध्ये कोणतेही शिळे वा अयोग्य खाद्यपदार्थ आढळून आले नसल्याचे सांगत कॅन्टीनच्या खाद्यपदार्थांवर केलेले सर्व आरोप मागे घेतले आहेत.
हे देखील वाचा –
मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड..
कैद्याला फाशी ऐवजी विषारी इंजेक्शन केंद्राचा पर्याय देण्यास विरोध का ? सुप्रीम कोर्टाचा सवाल
Rahul Gandhi : बिहारमधील जागावाटपाचा गतिरोध सुटणार का? राहुल गांधींचा थेट लालू यादव यांना फोन..