Home / News / CAT Blow to Wankhede : कॅटचा वानखेडे यांना झटका अहवालातील नोंदी कायम

CAT Blow to Wankhede : कॅटचा वानखेडे यांना झटका अहवालातील नोंदी कायम

CAT Blow to Wankhede – माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी त्यांच्या वार्षिक कार्यप्रदर्शन अहवालातील (एपीएआर) नकारात्मक नोंदी हटवाव्यात, अशी...

By: Team Navakal
CAT Blow to Wankhede
Social + WhatsApp CTA

CAT Blow to Wankhede – माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी त्यांच्या वार्षिक कार्यप्रदर्शन अहवालातील (एपीएआर) नकारात्मक नोंदी हटवाव्यात, अशी याचिका केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात (कॅट) केली होती. मात्र कॅटने ही याचिका फेटाळली.

जुलै २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत त्यांच्या कामकाजाची पुन्हा तपासणी करताना अधिकाऱ्यांनी काही निरीक्षणे नोंदवली होती आणि गुणांकनही कमी केले होते. या नोंदी त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीशी तसेच त्या काळात आलेल्या तक्रारींशी संबंधित असल्याचा उल्लेख होता.

न्यायालयाने म्हटले की, वानखेडे हे या नोंदी अस्पष्ट आहेत किंवा कोणत्याही विशिष्ट घटनेवर आधारित नाहीत, हे सिद्ध करू शकले नाहीत. उलट त्यांच्या स्पष्टीकरणावरूनच या नोंदी मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणाशी संबंधित असल्याचे दिसते.

वानखेडे यांच्या बाजूने असा युक्तिवाद करण्यात आला की, त्यांना पूर्वी उत्तम गुणांकन मिळाले असून ‘इंटिग्रिटी’ कॉलममधील तक्रारीचा संबंध फक्त ‘सीक्रेट डायरी’ ठेवण्यात झालेल्या एका त्रुटीशी आहे.

पण सरकारच्या वकिलांनी हा दावा फेटाळला आणि एका प्रकरणात डायरी न ठेवल्याने संपूर्ण एपीएआर अमान्य ठरत नाही, असे सांगितले.

कॅटने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सरकारच्या बाजूला दिलेले मत मान्य करत वानखेडे यांची मागणी फेटाळत असे स्पष्ट केले की, ही एका प्रकरणातील नोट नसल्यामुळे अहवालावर परिणाम होत नाही.


हे देखील वाचा –

अमेरिकेत स्टारबक्स कर्मचाऱ्यांचे आंदोलन ! ममदानी यांचा पाठिंबा

सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले खा. राऊत स्टार प्रचारक

ईशान्येकडील एनपीपी पक्षाचा राज्याच्या राजकारणात प्रवेश

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या