CBI Moves SC Against Bail in Unnao Case – उन्नाव बलात्कार प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे हकालपट्टी केलेला माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी पिडीतेने इंडिया गेटवर आणि उच्च न्यायालयाच्या बाहेर आंदोलन केले.
सर्व स्तरातून याबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर सीबीआयने काल सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात विशेष अनुमती याचिका (स्पेशल लीव्ह पिटिशन) सीबीआयने दाखल केली आहे.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०१७ च्या उन्नाव बलात्कार प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशाचा अभ्यास केल्यानंतर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दाखल केले आहे.
हे प्रकरण अत्यंत गंभीर असून आरोपीचे दोष सिद्ध झाल्यानंतर त्याला दिलेली सवलत न्यायाच्या हिताविरुद्ध असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. याआधी सीबीआयच्या प्रवक्त्याने म्हटले होते की, उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात शक्य तितक्या लवकर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाने सेंगर यांची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करून त्याला जामीन मंजूर केला होता. मात्र, बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या कोठडीतील मृत्यूशी संबंधित प्रकरणात १० वर्षांची शिक्षा भोगत असल्याने सेंगर सध्या तुरुंगातच राहणार आहे.दरम्यान, उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेने काल सांगितले की, माझा सर्वोच्च न्यायालयावर दृढ विश्वास आहे.
जामिनाच्या आदेशामुळे माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेला आणि उपजीविकेला धोका निर्माण झाला आहे. माझ्या जिवाला धोका आहे. या आदेशाने मला आणि माझ्यासारख्या अनेक महिलांना जणू पिंजऱ्यात कैद केले आहे. माझ्या पतीची नोकरीही गेली आहे. आता आम्ही काय करायचे?
हे देखील वाचा –









