China, Britain and Spain announce support for Iran – इस्त्रायल आणि अमेरिकेने पूर्ण तयारीनिशी इराणवर ताकदीने हल्ला करीत युद्ध छेडले. यामुळे इराण दोन दिवसांत शरणागती पत्करेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र हे युद्ध सुरू होऊन चार दिवस झाले तरी इराणने माघार घेतलेली नाही. उलट आज चीन, ब्रिटन आणि स्पेन या तीन राष्ट्रांनी इराणला पाठिंबा जाहीर केला.
आमच्या हवाई हद्दीतून जायचे नाही, असे स्पेनने अमेरिकेला स्पष्ट बजावले. यामुळे हे युद्ध दीर्घकाळ सुरू राहणार हे स्पष्ट झाले आहे. याचा थेट परिणाम तेलाच्या पुरवठ्यावर होणार आहे. तेलाचे भाव आताच वाढले आहेत. भारताला तेलपुरवठ्याची अडचण निर्माण झाली असून आता पुन्हा रशियाकडून तेल घ्यावे का? याचा विचार सुरू झाला आहे.
आज ब्रिटन व स्पेनने इराणला पाठिंबा जाहीर केला. आम्ही या युद्धात अमेरिका व इस्त्रायलला कोणतीही मदत करणार नाही, असे या दोन्ही राष्ट्रांनी सांगितले. चीनने परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी ओमान, फ्रान्स व इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधून चर्चा केली. त्यानंतर इराणला पाठिंबा जाहीर करीत त्यांनी अमेरिका व इस्त्रायलला युद्ध तात्काळ थांबविण्याचा इशाराच दिला.
दरम्यान, आज दुसऱ्याही बाजूने अमेरिका अडचणीत आली आहे. इस्त्रायलला मदतीसाठी इराणवर हल्ला करण्याच्या दृष्टीने अमेरिकेने सौदी अरेबियाच्या भागात अनेक ठिकाणी हवाई व नौदल तळ निर्माण करून तिथे लढाऊ विमाने व जहाजे आणून ठेवली होती. मात्र इराणवर हल्ला होताच इराणने चाणाक्षपणे अमेरिकेचे हे तळ उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. आज बिरशेवा, बाहरीन, रियाध, दुबई, अबूधाबी, कतारवर इराणने पुन्हा जबरदस्त क्षेपणास्त्र डागली.
यामुळे तेथील अमेरिकेचे तळ उद्ध्वस्त झाले. आता इराणवर हल्ला करण्यासाठी शस्त्रास्त्रे नाहीत, असे आज ट्रम्प यांनी कबूल केले आहे. अमेरिकन तळांवर इराणने केलेले हल्ले इतके ताकदवान होते की, अमेरिकेने अखेर तेथील सैनिकांना माघारी बोलावले. जॉर्डन, बहारीन येथील अमेरिकी दुतावासावर हल्ले झाल्याने अमेरिकेने तेथील अधिकाऱ्यांनाही परतण्यास सांगितले. राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प व सचिव मार्को रुबियो म्हणाले की, आमची पूर्ण तयारी आहे.
किती दिवस लढावे लागले तरी चालेल. आम्हाला यश मिळेलच आणि यात यश मिळाले की, जग सुरक्षित होईल.
इस्त्रायलने शिया मुस्लिमांचे सर्वेाच्च नेते खामेनी यांना ठार मारल्याचा बदला घेत इराणने आज पवित्र जेरूसलेम शहरावरही विध्वंसक हल्ला केला. यहुदी, मुस्लीम आणि ख्रिश्चनांसाठी जेरूसलेम अत्यंत पवित्र आहे. या हल्ल्यात कितीजण ठार झाले याची माहिती अद्याप उघड झाली नसली तरी या हल्ल्यानंतर जेरूसलेमच्या प्रत्येक रस्त्यावरून सायरन वाजवत रुग्णवाहिका एकामागे एक धावत असतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
इराण आक्रमण करीत असतानाच इस्त्रायलनेही इराणवर हल्ले सुरूच ठेवले होते. इस्त्रायलने ओमान खाडीत 11 इराणी जहाजे नष्ट केली, नतांज अणुकेंद्रावर पुन्हा हल्ला केला, हिजबुल्लाहचा गड असलेल्या बेरूतवर क्षेपणास्त्रे डागली.
तेहरान शहरातील प्रशासकीय व रहिवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत, अनेकांना आग लागली आहे, याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. आज इस्त्रायलने आपल्या फौजा दक्षिणी लेबनॉनमध्ये तैनात करून तेथूनही हिजबुल्लाच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले.
दरम्यान, भारताने वेगवान हालचाली करीत दुबई व इतर राष्ट्रात अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप भारतात आणण्यासाठी एअर इंडिया, इंडिगो, स्टार अलायन्सची विमाने पाठवली आणि आज या पर्यटकांचे भारतात आगमन सुरू झाले.
त्याचवेळी संकटाच्या वेळी भारत आपल्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला म्हणून मी भारताचे आभार मानतो, असे इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी जाहीर केले. भारताच्या अधिकृत प्रवक्त्याने शासकीय निवेदन जारी करीत म्हटले की, आखाती प्रदेशात जवळजवळ 1 लाख भारतीय आहेत. त्यांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. चर्चा आणि संयम बाळगून हे युद्ध लवकरात लवकर संपवावे, अशी आम्ही विनंती करतो.
अमेरिकेला जगाचा
हुकूमशहा बनायचे आहे
जेफ्री सॅच या अमेरिकन अर्थशास्त्र तज्ज्ञाने म्हटले की, इराणला कधी अणुबॉम्ब तयार करायचाच नव्हता. पण तरीही हे कारण देऊन हा हल्ला करण्यात आला. अमेरिकेतील तीन तृतियांश नागरिकांचा विरोध आहे. नेतान्याहू म्हणाले की, या भागात इस्त्रायलचे वर्चस्व असावे हे त्यांचे 40 वर्षांचे स्वप्न आहे. अमेरिकेला जागतिक वर्चस्व हवे आहे.
यासाठीच हे दोघे एकत्र आले आणि पूर्ण नियोजन करून या दोघांनी हल्ला केला. अमेरिका खोटे बोलते, फसविते, हे त्यांच्याशी कराराची चर्चा करता येत नाही. हे लोक रोज नवीन बोलतात. आधी ब्रिटिशांनी जगावर राज्य केले, तसे आता अमेरिका राज्य करण्याचे स्वप्न पाहत आहे. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय घटनेत स्पष्ट लिहिले आहे की, दुसऱ्या राज्याच्या सीमेत प्रवेश करता येत नाही. भारत देश हा ब्रिक्सचा अध्यक्ष आहे.ब्रीक्स इस्त्रायल व अमेरिकेला पाठिंबा देणार की, विरोध करणार हा प्रश्न आहे. भारताला पण चीनची भीती दाखवून अमेरिकेला पाठिंबा द्यायला लावतील.
इराणने होर्मुझ स्ट्रेटवर कब्जा ठेवला आहे. याचा भारत व चीनवर गंभीर परिणाम होणार आहे. हे संकट काही महिने घोंघावत राहील. या सर्व युद्धांचा युरोपवर विपरित परिणाम होतो. याचे कारण अमेरिकन गुप्तहेरांनी युरोपची राष्ट्र काबीज केली आहेत. स्पेन वेगळा आहे. फ्रान्स अजुनही राजेशाहीच्या मनःस्थितीत आहे. हे युद्ध सुरू झाले तेव्हा ट्रम्पची लोकप्रियता केवळ 37 टक्के होती. दुबई, अबुधाबी ही सुरक्षित स्थळे मानली जात होती. पण आता तसे राहिले नाही. यामुळे त्यांना खूप नुकसान होणार आहे.
अमेरिकेने स्वार्थासाठी सरकारे उलथवली
2001- अल कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनने अमेरिकेवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला करून नंतर लादेनला ठार केले.
2003 – इराकच्या तेल साठ्यांवर कब्जा करण्यासाठी सद्दाम हुसेनवर जैविक अस्त्र तयार करीत असल्याचा खोटा आरोप करून इराकवर हल्ला करत शेवटी सद्दामका फाशी दिली.
2011 – लिबियातील तेलसाठे काबीज करण्यासाठी लिबियातील बंडखोरांना मदत करून मुअम्मर गद्दाफी सरकार उलथवून गद्दाफीना ठार मारले
2013- इजिप्तचे मोर्सी सरकार पाडले. मोर्सी यांचे मध्यपूर्वेतील वर्चस्व मोडून काढायचे होते.
2014 – युक्रेनचे व्हिक्टर यनुकोव्हच यांनी रशियाबरोबर संबंध सुधारायला सुरुवात करताच त्यांचे सरकार पाडले.
2017- इराण व रशियाचे वर्चस्व मोडीत काढायला सिरीयाचे असद सरकार उलथवून अमेरिकेच्या मर्जीतील सरकार स्थापन केले.
2019 – लिथियमचे सर्वाधिक साठे असलेल्या बोलिवियातील इवा मोरालेस यांचे सरकार उलथवून टाकले.
हे देखील वाचा –
इराणसोबतचे युद्ध किती दिवस चालणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
भारत पुन्हा युद्धाची तयारी करत आहे’; पाकिस्तानच्या राष्ट्रपतींचे खळबळजनक विधान
कुवेतमध्ये विशाखा सुभेदार यांचा मुलगा अडकला; सरकारकडे मदतीचीची हाक











