China hands over third ‘Hangor’-class submarine to Pakistan
वुहान – चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्य अधिक घट्ट होत असल्याचे दिसत आहे.(Hangor class submarine)चीनने पाकिस्तानसाठी बांधलेल्या ८ अत्याधुनिक ‘हंगोर-श्रेणी’च्या पाणबुड्यांपैकी तिसरी पाणबुडी पाकिस्तानच्या (China Pakistan submarine deal)नौदलाकडे सुपूर्द केली आहे.हिंदी महासागरात आपला प्रभाव वाढवण्याच्या चीनच्या धोरणाचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे.(China military support Pakistan)
मध्य चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान येथील शिपयार्डमध्ये या तिसऱ्या पाणबुडीचा जलावतरण समारंभ नुकताच पार पडला.चीन पाकिस्तानसाठी बांधत असलेल्या आठ पाणबुड्यांपैकी दुसरी पाणबुडी यावर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानला सुपूर्द केली होती.गेल्या काही वर्षांत चीनने पाकिस्तानला चार आधुनिक युद्धनौका दिल्या आहेत. (Type 039 submarine Pakistan)अरबी समुद्रात चीनचे नौदल हळूहळू त्यांचे अस्तित्व वाढवत आहे.तसेच पाकिस्तानातील ग्वादर बंदर आणि हिंद महासागरातील चीनच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता, पाकिस्तानच्या नौदलाला मजबूत करण्यासाठी या (Pakistan Navy submarines)युद्धनौकांचा पुरवठा करण्यात आला आहे. तिसऱ्या पाणबुडीच्या जलावतरण सोहळ्यात पाकिस्तानचे डेप्युटी चीफ ऑफ नेव्हल स्टाफ प्रोजेक्ट-२, व्हाइस अॅडमिरल अब्दुल समद म्हणाले की, हँगोर- श्रेणीतील या पाणबुडीमध्ये असलेली आधुनिक शस्त्रे आणि प्रगत सेन्सर्स प्रादेशिक शक्तीचे संतुलन राखण्यासाठी आणि समुद्रात स्थैर्य टिकवण्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत. या ८ पाणबुड्यांच्या करारामुळे पाकिस्तानची पाण्याखालून हल्ला करण्याची क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे. चिनी लष्करी तज्ज्ञ झांग जुन्शे यांच्या मते, हंगोर श्रेणीची ही पाणबुडी एक धोकादायक शस्त्रप्रणाली असू शकते. पाण्याखालील शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी यात अत्यंत संवेदनशील सेन्सर आहेत.शत्रूच्या रडारला सहज चकवा देण्याची क्षमता तिच्यात आहे.दीर्घकाळ पाण्याखाली राहण्याची क्षमता आणि जबरदस्त मारक क्षमता असलेली ही पाणबुडी आहे.(China arms export)