Home / News / जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचे ६ जूनला लोकार्पण

जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचे ६ जूनला लोकार्पण

नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमधील जगातील सर्वात उंच असलेल्या चिनाब नदीवरील युएसबीआरएल प्रकल्पांतर्गत चिनाब रेल्वे पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

By: Team Navakal

नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमधील जगातील सर्वात उंच असलेल्या चिनाब नदीवरील युएसबीआरएल प्रकल्पांतर्गत चिनाब रेल्वे पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी एक्स पोस्ट केली. याशिवाय या लोकार्पण कार्यक्रमावेळी कटरा ते श्रीनगर या दोन विशेष वंदे भारत ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधलेला हा पूल भारताच्या अभियांत्रिकी कौशल्य आणि तंत्रज्ञानाचे एक उत्तम उदाहरण समजला जात आहे. आर्च तंत्रज्ञानावर आधारित हा पूल ३५९ मीटर उंच आणि १३१५ मीटर लांब असून तो आयफेल टॉवरपेक्षा सुमारे ३५ मीटर उंच आहे. २००३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना या पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली होती. त्यासाठी सुमारे १,४८६ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी एक्सवर लिहिले की, ऐतिहासिक आणि जगातील सर्वात उंच आणि मजबूत अशा चिनाब रेल्वेपुलाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ६ जूनला लोकार्पण होणार आहे. हा मार्ग उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. या पुलाचे बांधकाम भौगोलिक व नैसर्गिक आपत्तीत तो टिकून राहिल, अशा पद्धतीने केले आहे. हा पूल नवीन भारताच्या बळकटीचे आणि दूरदृष्टीचे अभिमानास्पद प्रतीक ठरणार आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या