Home / News / मराठ्यांच्या पोटाची चिंता आपली अमित ठाकरेंचे मदतीचे आवाहन

मराठ्यांच्या पोटाची चिंता आपली अमित ठाकरेंचे मदतीचे आवाहन

Concern for Marathas’ Well-being: Amit Thackeray’s Call for Help

Concern for Marathas’ Well-being: Amit Thackeray’s Call for Help

Amit Thackeray Appeals for Maratha Protesters – मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray )यांच्यावर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी एकेरी भाषेत टीका केल्यानंतर अमित ठाकरे (Amit Thackeray)हे मराठ्यांच्या (Maratha protesters)मदतीला धावून आले आहेत. राज्यभरातील मनसैनिकांना(MNS) आंदोलक मराठा बांधवांच्या अन्न-पाण्याची व राहण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन अमित यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

अमित ठाकरे निवेदनात म्हणाले, की मराठा आरक्षणाचा निकाल शासनाच्या हाती आहे. पण आज जे हजारो बांधव मुंबईत आले आहेत, ते आपलेच आहेत. ते शेतकरी, मजूर, शिक्षणासाठी संघर्ष करणारे युवक आहेत. त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यांत त्यांच्या पोटाची चिंता दिसू नये ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे अन्न-पाणी, औषधोपचार, सुरक्षिततेची काळजी घ्या. मुंबईत एकाही मराठा बांधवाला एकटं वाटता कामा नये. एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे.

राज ठाकरे कुजक्या कानाचे आहेत, मानाचे भुकेले आहेत, अशी टीका जरांगेंनी केली होती. त्यावर अमित ठाकरे म्हणाले की, आमची भूमिका बदलेली नाही. मागच्यावेळी मराठा आंदोलक पनवेलपर्यंत येऊन परत गेले होते. त्यांना काय आश्वासन दिले? आता का परत आले? ज्यांनी आश्वासन दिले, त्यांना विचारायला नको का? तुम्ही कोणाला मूर्ख बनवाता? मुंबईकरांना त्रास होतो आहे, पण ते आपली मागणी घेऊन आले आहेत, त्यामुळे सरकारने उत्तर द्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नक्कीच नको असेल की राज्यात कुठे अनुचित घडावे, ते योग्य निर्णय घेतील.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना वानखेडेसारखे ठिकाण द्यावे. त्यामुळे मुंबईकरांना त्रास होणार नाही. इथली कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही. सरकारने आंदोलकांना मदत करावी, असे आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मराठा आंदोलकांना मदत करता का? एकनाथ शिंदे म्हणाले…

जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार?आरोपांना शशिकांत शिंदेंचे आव्हान

महिन्याला फक्त 13 हजार भरा आणि घरी घेऊन जा सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; वाचा सविस्तर