Home / News / मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधण्यास कोर्टाचा नकार

मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधण्यास कोर्टाचा नकार

Court Denies Blanket Identification of Maratha Community as Kunbi

Court Denies Blanket Identification of Maratha Community as Kunbi

Court Rejects Kunbi Tag for Marathas – मराठा समाजाला ओबीसी (OBC)प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)उपोषणाला बसले आहेत. मात्र या मागणीसमोर मोठा कायदेशीर पेच उभा राहिला आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि (Supreme Court)सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मराठा समाजाला ‘सरसकट कुणबी’ संबोधण्यास कायदेशीर अडचण येत आहे. भाजपच्या (BJP)गोटातून आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीसमोर हा गंभीर अडसर असल्याचे सांगितले जात आहे.

२००१ , २००३ आणि २००५ मधील निकालांतही हाच निर्णय स्पष्ट करण्यात आला होता. न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे की, मराठा आणि कुणबी(Kunbi) या दोन स्वतंत्र जाती आहेत. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे किंवा ओबीसी प्रवर्गात थेट समाविष्ट करणे हा सामाजिक मूर्खपणा ठरेल. अशा पद्धतीने दिलेले कुणबी प्रमाणपत्र महाराष्ट्राच्या वास्तविक सामाजिक व्यवस्थेच्या (स्टार्क सोशल रियालिटीज) विरोधात जाईल आणि त्याचे दूरगामी परिणाम होतील, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

पंतप्रधान मोदी ७ वर्षांनी चीनमध्ये जिनपिंग यांच्याशी ५० मिनिटे चर्चा

जरांगेंच्या मागण्यांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू! शरद पवारांना विखे पाटलांचा टोला

मराठा समाज मागासलेला नाही! चंद्रकांत पाटलांचे विधान वादात