Home / News / देशात कोरोना रुग्ण घटले ! २४ तासांत ५०७ रुग्ण बरे

देशात कोरोना रुग्ण घटले ! २४ तासांत ५०७ रुग्ण बरे

नवी दिल्ली – देशभरात कोरोना बाधित (Covid-19 cases)रुग्णांमध्ये घट झाली आहे. काल देशभरात ६८३६ सक्रिय रुग्ण होते. आज त्यात घट...

By: Team Navakal
covid 19 cases

नवी दिल्ली – देशभरात कोरोना बाधित (Covid-19 cases)रुग्णांमध्ये घट झाली आहे. काल देशभरात ६८३६ सक्रिय रुग्ण होते. आज त्यात घट होऊन ही संख्या ५९७६ पर्यंत कमी झाली.तर मागील २४ तासांत ५०७ रुग्ण बरे झाले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत १७,१६४ रुग्णांनी कोरोवर मात केली आहे. ११६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासांत दिल्लीत (Delhi)दोघांचा आणि केरळमध्ये एकाचा मृत्यू झाला.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (Ministry of Health and Family Welfare)माहितीनुसार, केरळमध्ये (Kerala)सर्वाधिक १३०९ बाधित रुग्ण आहेत. तर २४ तासांत ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. दिल्लीत ६३२ बाधित रुग्ण आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra)काल ५१२ सक्रिय रुग्ण होते तर आज ही संख्या ४४३ वर आली. गुजरातमध्ये आज १०४६, पश्चिम बंगाल ७४७, उत्तर प्रदेश २५७, राजस्थान (Rajasthan)२१९, हरियाणा १०६, आंध्र प्रदेश ४९, आसाम ३०, कर्नाटक (Karnataka) ४६६, मध्य प्रदेश १३१, मणिपूर ३५, ओडिशा ५२, जम्मू आणि काश्मीर १५, गोवा ५ सक्रिय रुग्ण आहेत. काल प्रमाणे आज ही हिमाचल प्रदेश, मिझोरम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही.

Web Title:
संबंधित बातम्या