Cricket Handshake Refused But Shared in Hockey – पहलगाम येथे पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तान या दोन्ही देशात कटुता निर्माण झाली होती.
त्यामुळे आशियाई कपवेळी भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही आणि चषकही घेतला नाही . मात्र काल मलेशियाच्या जोहोर बहारु येथील सुलतान जोहोर कप हॉकी स्पर्धेच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंबरोबर हस्तांदोलन केले.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. त्यानंतर भारताने अचानक युद्धबंदी केली. आपल्या सांगण्यावरुन ही युद्धबंदी झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.
त्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरचे संबंध सर्वच स्तरावर संपुष्टात आणले. मात्र दुबईतील आशियाई कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानबरोबर खेळण्याचा निर्णय भारताने घेतला. त्यांनी सामना खेळला,
परंतु त्यावेळी भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंबरोबर हस्तांदोलन करण्याचे टाळले होते. मलेशियात मात्र भारताच्या हॉकी संघाने दोन्ही देशांचे राष्ट्रगीत झाल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंबरोबर हस्तांदोलन केले. त्यानंतर झालेला हा सामना ३-३ असा बरोबरीत सुटला.
हे देखील वाचा –
बाबासाहेब पाटलांचा पालकमंत्रिपदाचा राजीनामा ! इंद्रनील नाईक नवे पालकमंत्री
चंद्रकांत पाटलांचा सल्ला घ्यावा लागेल ! रवींद्र धंगेकरांचा टोला