Darjeeling Bridge Collapse: 7 Dead – पश्चिम बंगालमध्ये (West Begal )काल झालेल्या मुसळधार पावसामुळे दार्जिलिंग (Darjeeling) येथील पूल कोसळून (Bridge Collapse) झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. दार्जिलिंगच्या डोंगराळ भागात अनेक ठिकाणी दरडीही कोसळल्या आहेत.
दार्जिलिंगच्या मिरिक भागातील दुधिया इथे असलेल्या या लोखंडी पुलाचा काही भाग कोसळला. त्यामुळे सिलीगुडी ते दार्जिलिंग मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली.
पुलाखाली दबल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दार्जिलिंगच्या अनेक भागामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कालिम्पोंगमध्येही स्थिती गंभीर असून सुखिया भागातही दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
पावसामुळे अनेक डोंगराळ भागांचा संपर्क तुटल्याने बचाव कार्यातही अडथळे निर्माण झाले आहेत. अनेक रस्त्यांवर डोंगरातून वाहून आलेला चिखल पसरल्यामुळे रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत.
हे देखील वाचा –
बेकायदेशीर अटकेला आक्षेप ! सरकारला १ लाखांचा दंड ! उच्च न्यायालयाची कारवाई









