Home / News / Disha Case Update : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अद्याप वैद्यकीय अहवाल नाही

Disha Case Update : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अद्याप वैद्यकीय अहवाल नाही

Disha Case Update – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आता...

By: Team Navakal
Disha Case Update
Social + WhatsApp CTA


Disha Case Update – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आता याप्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

दरम्यान याप्रकरणी न्यायालयाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. मात्र या मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाने महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली.

यामध्ये दिशा हिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा  आरोप करणारी याचिका तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याचबरोबर तिच्या मृत्यूचा  गुन्हा दाखल करून त्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी  केली आहे. तर राज्यातील काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी हे प्रकरण दडपण्यात येत असल्याचा आरोपही सतीश सालियन यांनी  केला.

या सुनावणीवेळी दिशा हिच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोणताही आदेश देण्यापूर्वी सर्व वैद्यकीय अहवाल मिळणे आवश्यक असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मात्र अजूनही फाॅरेन्सिक अहवाल आलेला नाही . ही दिरंगाई थक्क करणारी आहे.

दिशाचे वडील सतीश सालियन यांनी  कोर्टात याचिका करून  सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आपल्या मुलीवर सामुहिक अत्याचार झाला असे त्यांचे म्हणणे आहे.याबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती, त्यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने निर्णय घेण्यापूर्वी वैद्यकीय अहवाल मागितला आहे . दिशा सालियन हिचा २०२० मध्ये मृत्यू झाला होता. राज्य सरकारने यावेळी पुरावे नव्याने  पाठवले असल्याने ते अद्याप फॉरेन्सिक अहवालाची वाट पाहत असल्याचे सांगत वेळ मागितला.

न्या. अजेय गडकरी आणि न्या. आर.आर. भोसले यांच्या खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले की, कोणतेही प्रथमदर्शनी मत मांडण्यासाठी अहवाल मिळणे गरजेचे आहे. त्यावर सालियन यांच्या वकिलांनी आम्ही फक्त गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी करत आहोत व त्यासाठी अहवालाची  गरज वाटत नाही असे म्हटले.

मात्र कोर्टाने त्यांचे हे म्हणणे खोडून काढत, कोणीतरी मृत झाले आणि न्यायालय म्हणून आम्हाला तुमच्या मागणीचा विचार करण्यासाठी रिपोर्ट आवश्यक आहे, असे स्पष्ट केले.


हे देखील वाचा –

अर्शदीप सिंगच्या नावावर नकोसा विक्रम, एकाच ओव्हरमध्ये टाकले 13 चेंडू; गंभीर संतापला

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी; रिफंडही मिळणार, विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

Web Title:
संबंधित बातम्या