Home / News / डॉक्टर नितीन अभिवंत यांचे हिमालयात ट्रेकिंग करताना निधन

डॉक्टर नितीन अभिवंत यांचे हिमालयात ट्रेकिंग करताना निधन

पुणे- ससून रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागाचे डॉक्टर नितीन अभिवंत (वय ४२) यांचे हिमालयातील ट्रेकिंग (trekking) दरम्यान आकस्मिक निधन झाले. श्वासोच्छवासात अडथळा...

By: Team Navakal

पुणे- ससून रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागाचे डॉक्टर नितीन अभिवंत (वय ४२) यांचे हिमालयातील ट्रेकिंग (trekking) दरम्यान आकस्मिक निधन झाले. श्वासोच्छवासात अडथळा आल्याने त्यांना जीव गमवावा लागला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

नितीन अभिवंत यांना गिर्यारोहणाची आवड होती. शनिवारी ते मुंबईहून बुरान व्हॅली (हिमालय) येथे महाविद्यालयीन मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. गिर्यारोहणास प्रारंभ केल्यानंतर त्यांना धाप लागली आणि घाम फुटू लागला. त्यांच्यासोबत असलेल्या दोन डॉक्टर मित्रांनी प्रथमोपचार (first aid) केले. परिस्थिती गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेव्हाच त्यांचे निधन झाले होते. डॉ. अभिवंत यांना गिर्यारोहणाची विशेष आवड होती. त्यांनी ससून रुग्णालयातील प्रशासकीय जबाबदाऱ्या अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. अनेक राष्ट्रीय उपक्रम तसेच संशोधन प्रकल्पांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता, असे त्यांचे सहकारी डॉ. नितीन थोरात यांनी सांगितले.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या