Dress code to be implemented at Ganpati pule temple
रत्नागिरी- कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपती पुळे(Ganpatipule Temple) येथील स्वयंभू गणपती मंदिरात भाविक व पर्यटकांनी भारतीय हिंदू संस्कृतीला साजेसा पारंपरिक पोशाख(Religious Guidelines) करूनच देवदर्शन घेता येणार आहे. याकरिता लवकरच ड्रेसकोड लागू करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर यांनी दिली.(Temple Rules)
सध्या या निर्णयाबाबत जनजागृतीसाठी मंदिर परिसरात प्रबोधनपर फलक लावण्यात आले असून, भाविकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रमुख देवस्थांनांप्रमाणे येथेही पारंपरिक व (Clothing Regulation)सभ्य पोशाखाचे पालन अनिवार्य होणार आहे.(Hindu Tradition)
याआधी लोणावळ्याजवळील कोळी समाजाच्या आराध्य दैवत असलेल्या आई(EKVIRA DEVI)एकविरा मंदिरात ७ जुलैपासून ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आले आहे. धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे.