Electricity workers to go on a statewide strike on July 9
मुंबई – वीज कामगार संघटनां ९ जुलै रोजी राज्यव्यापी संपावर जाणार आहेत. (Maharashtra electricity strike)समांतर वीज परवाना धोरणाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. यात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, (आयटक), सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार कॉग्रेस (इंटक), तांत्रीक कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन या वीज कामगार संघटनांचा समावेश आहे.(July 9 power workers protest)
समांतर वीज परवाना धोरणाच्या अंतर्गत अदानी पॉवर, टोरंट पॉवर या कंपन्यांनी महावितरण कंपनीचे एकूण २४ विभागाचे, वीज वितरण, महसूल, संचलन व सुव्यवस्था स्वतःच्या अधिकारात घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाला अर्ज सादर केले आहेत. या अर्जाद्वारे टोरंट पॉवर कंपनीने नागपूर, पुणे, पिंपरी, चिंचवड, बारामती, इंदापूर, दौंड, सासवड, रांजनगांव, चाकण, कुरकुंभ, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे महापालिका क्षेत्र अशा एकूण १६ शहरांचे वीज वितरण, संचलन, देखभाल, दुरुस्ती व महसुलाचा अधिकार आम्हाला द्या, अशी विनंती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अदानी पॉवरने देखील मुलुंड, भांडूप, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, खारघर, तळोजा व उरण या विभागासाठी अर्ज केला आहे. (Maharashtra energy crisis)तिन्ही वीज कंपन्यांचे खासगीकरण नको, स्मार्ट मिटर योजनेविरूध्द, जलविद्युत निर्मिती केंद्राचे खाजगीकरण, ४२ हजार कंत्राटी-बाह्य स्त्रोत कामगारांना कायम करण्यात यावे, महावितरण कंपनीचे ३२९ सबस्टेशन्स खासगी ठेकेदारांना चालविण्यास काढलेल्या निविदा रद्द करावे, तिन्ही वीज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंत्यांना शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार पेन्शन योजना लागु करावी, या प्रश्नांकरीता वीज कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व संघटनांनी स्थापन केलेल्या कृती समितीने महाराष्ट्र शासन, ऊर्जामंत्री व तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाला २३ जून रोजी या संपाबाबत रितसर नोटीस दिली असून या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संप यशस्वी करण्यासाठी राज्यभर दौऱ्याचा कार्यक्रम आखला आहे.