Home / News / कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! EPFO ने केला मोठा बदल: आता UPI आणि ATM वरून तात्काळ मिळणार PF रक्कम

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! EPFO ने केला मोठा बदल: आता UPI आणि ATM वरून तात्काळ मिळणार PF रक्कम

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच पैसे काढण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करणार आहे. यानुसार, कर्मचारी आता UPI आणि एटीएमद्वारे...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच पैसे काढण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करणार आहे. यानुसार, कर्मचारी आता UPI आणि एटीएमद्वारे पीएफची रक्कम तात्काळ काढू शकतील. हे बदल मे 2025 च्या शेवटी किंवा जून 2025 च्या सुरुवातीला लागू होण्याची शक्यता आहे.

या सुधारणेनंतर, कर्मचाऱ्यांना आपल्या पीएफ बचतीचा लाभ घेण्यासाठी किचकट आणि वेळखाऊ प्रक्रियेचा सामना करावा लागणार नाही. श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सहकार्याने हे बदल लागू केले जात असून, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नेही याला मंजुरी दिली आहे.

या निर्णयाचा फायदा देशभरातील लाखो EPFO सदस्यांना होणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता दौरा यांनी सांगितले की, कर्मचारी तात्काळ 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतील. त्यांनी पुढे नमूद केले की, UPI प्लॅटफॉर्मवर थेट (PF Withdrawals Via UPI) पीएफ शिल्लक तपासता येईल आणि कोणत्याही विलंबाशिवाय इच्छित बँक खात्यात निधी हस्तांतरित करता येईल. या सुविधेमुळे गरजेच्या वेळी कर्मचाऱ्यांना त्यांचे पैसे सहज मिळतील.

सध्या पीएफ रक्कम काढण्यासाठी ऑनलाइन दावा करावा लागतो आणि मंजुरीसाठी काही दिवस किंवा कधी कधी आठवडे प्रतीक्षा करावी लागते. परंतु नव्या सुविधेमुळे ही प्रक्रिया जलद आणि सुलभ होणार आहे. कर्मचारी केवळ तात्काळ पैसे काढू शकणार नाहीत, तर पीएफ शिल्लक तपासून त्वरित व्यवहारही करू शकतील. वैद्यकीय आणीबाणी, घर खरेदी, शिक्षण किंवा लग्नासाठीही सदस्य निधी काढू शकतील.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या