Explosion at Chemical Factory in Hyderabad: 10 Dead, Several Injured
हैदराबाद – तेलंगणाच्या(Hyderabad) संगारेड्डी जिल्ह्यातील पाटण चेरू मंडळातील सिगाची केमिकल्स(chemical Explosion) या रसायनांच्या कारखान्यात (Chemical Factory) भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनीत आग लागली. यात १० (Death)कामगारांचा जळून मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
आज सकाळच्या सुमारास रिॲक्टरमध्ये स्फोट (Accident)झाल्यामुळे भीषण आग लागली. यावेळी कामगार कारखान्यात काम करत होते. स्फोटाचा आवाज ऐकून काही कर्मचारी घाबरुन कारखान्याबाहेर पळाले. मात्र, अनेकजण आतच अडकले. त्यातील किमान १० जणांचा आगीत जळून जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. ही आग मोठी असल्याने अग्निशमन दलाचे २ बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. यातील जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मृतांचा आकडा वाढू शकतो अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.