मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक जातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज आझाद मैदानावर सुरु झालेल्या मराठा आंदोलनाविषयी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मला नेता समजावे म्हणून इतर जातींमध्ये भांडण लावण्याचे काम फडणवीसांकडून सुरू आहे, असेही राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी ठोस प्रस्तावासह मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला हवी होती. आपण ब्राह्मण समाजासाठी परशुराम महामंडळ स्थापन करून निधी उपलब्ध केला. याशिवाय प्रशासनातील ५ वरिष्ठ अधिकारी तुम्ही कामाला लावले. आता मराठा समाज रस्त्यावर आहे ही एक दरी फडणवीसांनी समजून घेतली पाहिजे. यामुळेच लोक त्यांच्यावर चिडले आहेत. त्यांच्यावर जे जातीय द्वेष निर्माण केल्याचे आरोप होत आहेत त्यासाठी ते स्वत: जबाबदार आहेत, अशी स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी जोडली.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
श्रीगोंद्यात अजित पवारांच्या दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न
सर्वात मोठा टीव्ही भारतात लाँच, किंमत तब्बल 30 लाख रुपये; जाणून घ्या वैशिष्ट्ये