Farmer Assaulted for Protesting Windmill Project in Dharashiv
Farmer Assaulted in Dharashiv – धाराशिवमध्ये (Dharashiv) पवनचक्की प्रकल्पाविरोधात (protest against a windmill) तक्रार करत उपोषण केलेल्या बजरंग कोळेकर (Bajrang Kolekar) या शेतकरी तरुणाला कंपनीशी संबंधित गुंडांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शेतकरी गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पवनचक्की प्रकल्पातील अनियमितता आणि स्थानिक शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात बजरंग यांनी तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणी उपोषणही केले होते. याचा राग मनात धरून संबंधित कंपनीच्या समर्थकांनी त्यांना मारहाण केली.
बजरंग कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना हॉकी स्टिकने २२ मिनिटे सलग मारहाण झाली. पाठ पूर्ण काळीनिळी झाली. शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना यापूर्वीही धमक्या देण्यात आल्या होत्या.
मागील वर्षी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मस्साजोग गावात पवनचक्कीच्या वादातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. धाराशिवमधील ही घटना त्याचीच पुनरावृत्ती असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांमधून व्यक्त केली जात आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
Raja Raghuvanshi सोनमच्या समोरच राजा रघुवंशीची हत्या! 5 जणांविरुद्ध आरोपपत्र
व्हिएतनामच्या कंपनीची भारतात एन्ट्री, लाँच केल्या दोन दमदार इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या किंमत
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 2050 मध्ये कसे दिसतील? AI ने दाखवले धक्कादायक चित्र