मुंबईतून खंडणीसाठी अपहरण! Kidnapping for ₹50 Lakh

"Businessman Abducted from Mumbai for Ransom"


मुंबई – गुजरातच्या सूरतमधील कपडा व्यापारी रोहित जैन यांचे मुंबईतील एका हॉटेलमधून फिल्मी स्टाईल अपहरण (Mumbai Kidnapping Case)करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्याचबरोबर त्याच दिवशी त्यांच्या सूरतमधील (Rohit Jain Abduction)घरी जाऊन अपहरणकर्त्यांच्या साथीदारांनी त्याच्या पत्नीकडून २१ लाख रुपयांचे सोन्याचे दागिनेही लुटून नेले.
या अपहरणनाट्याचे (Surat to Mumbai Crime)सीसीटिव्ही फूटेज हाती लागले आहे. पोलीस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत. रोहित जैन हे व्यावसायिक कामानिमित्त १९ जुलै रोजी सूरतहून मुंबईला आले होते. मुंबईत ते सोना हॉटेलमध्ये उतरले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित जैन यांच्या पत्नीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता. त्यामुळे त्यांनी रोहित यांचा मुंबईत राहणारा मित्र मेहूल याला फोन करून हॉटेलवर जाऊन नेमके काय झाले ते तपासण्यास सांगितले. मेहुल हॉटेलवर आला असता रोहित जैन हे पहाटे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास हॉटेलबाहेर पडल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.(Gujarat Businessman Kidnapped)
मेहुलने हॉटेलचे सीसीटिव्ही फुटेज तपासले असता चार— पाच जण रोहित यांना जबरदस्ती ओढत गाडीमध्ये ढकलताना आढळून आले. रोहितचे अपहरण करण्यात आल्याचे त्याला कळाले.
हे अपहरणनाट्य इथेच संपले नाही. त्याच दिवशी राहुल
आणि चिराग नावाचे दोन तरूण रोहित जैन यांच्या सूरतमधील घरी गेले. त्यांनी रोहित जैन यांचे त्यांच्या पत्नीशी बोलणे करून दिले. रोहित यांनी पत्नाला काहीही करून ५० लाख रुपये (50 Lakh Ransom Demand)जमा करून राहुल आणि चिराग यांना देण्यास सांगितले. हे बोलताना रोहित प्रचंड घाबरे असल्याचे त्यांच्या पत्नीने जाणले. आपला पती अडचणीत असल्याचे पाहून तीदेखील गर्भगळीत झाली. त्याचवेळी राहुल आणि चिराग यांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली.एवढी रोकड घरात नाही असे रोहित यांच्या पत्नीने सांगताच राहुल आणि चिराग यांनी तिच्याकडून २१ लाख रुपये किंमतीचे दागिने मिळवले आणि ते फरार झाले. एकूणच हे अपहरणनाट्य अत्यंत विचारपूर्वक रचलेले कारस्थान असावे असा पोलिसांचा कयास आहे.त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.