Uttarkashi Flood उत्तरकाशी धारालीत जलप्रलय४ मृत्यू तर अनेकजण बेपत्ता

Flood havoc in Dharali, Uttarkashi: 4 dead, many missing

Flood havoc in Dharali, Uttarkashi: 4 dead, many missing

उत्तरकाशी – उत्तरकाशी जिल्ह्यातील(Dharali flash flood) धाराली गावात आज खीरगंगा(Kheerganga cloudburst) नदीच्या उगमस्थानी(Uttarkashi Dharali flood 2025) अचानक आलेल्या जलप्रलयामुळे प्रचंड नुकसान झाले. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण बेपत्ता असल्याची प्रशासनाची माहिती आहे.(4 dead in Uttarakhand flood)
गंगोत्री धाम मार्गावरील महत्त्वाच्या गावांपैकी एक असलेल्या धारालीमध्ये या नैसर्गिक दुर्घटनेत अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. याठिकाणी २५ पेक्षा जास्त हॉटेल व होमस्टे घरे, बाजारपेठा, दुकाने वाहून गेल्याची माहिती आहे. या दुर्घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामध्ये पूर व मातीचा ढिगारा गावात घुसताना व नागरिकांची धावपळ दिसते.या पुराचा वेग एवढा होता की नागरिकांना सुटकेची संधीही मिळाली नाही.(Gangotri route flood disaster)
उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांनी माहिती दिली की,अचानक आलेल्या महापुरामुळे संपूर्ण गावाला जोरदार तडाखा बसला आहे. प्रशासनाकडून जीवितहानी व मालमत्ता नुकसानीचा आढावा सुरु आहे. दुर्घटनेच्या माहितीनंतर बचाव व शोधमोहीमेसाठी एनडीआरआफ,एसडीआरएफ(NDRF SDRF rescue Uttarkashi)पथके घटनास्थळी दाखल झाली. तहसील व सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी इंडो-तिबेट सीमा पोलीस दल आणि एनडीआरआफला तत्काळ घटनास्थळी रवाना केले होते. बचावपथकांकडून अडकलेल्या नागरिकांचा शोध आणि त्यांचे सुरक्षित स्थलांतरासाठी प्रयत्न सुरू आहेत. धारालीव्यतिरिक्त बडकोट तालुक्यातील बनाल पाट्टी या भागातही जोरदार पावसाची नोंद झाली. येथे आलेल्या पुरात सुमारे १८ शेळ्या वाहून गेल्या.१० ऑगस्टपर्यंत उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.डोंगराळ भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे.