Former Governor Malik, who raised questions about Pulwama, passes away
नवी दिल्ली – जम्मू-कश्मीरचे (Former J&K Governor passes away)माजी राज्यपाल सत्यपाल मलिक(Satyapal Malik) यांचे आज ७९व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. जम्मू – काश्मीरचे राज्यपाल म्हणून २०१८ – २०१९ मध्ये त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळातच ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द झाला.(Article 370 abrogation)आज या ऐतिहासिक निर्णयाचा सहावा वर्धापन दिन आहे.
सत्यपाल मलिक यांनी १९७४ मध्ये चौधरी चरण सिंग यांच्या भारतीय क्रांती दलात प्रवेश करून बागपत येथून विधानसभा निवडणूक लढवत राजकीय कारकीर्द सुरु केली होती. ते तीन वेळा खासदार होते. याशिवाय पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये संसदीय कार्य आणि पर्यटन राज्यमंत्री म्हणूनही काम केले. लोक दल, काँग्रेस आणि जनता दल या पक्षातून राजकारणाचा प्रवास करत २००४ मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यांनी २०१७ – बिहार, गोवा आणि २०२२ पर्यंत ते मेघालय या राज्याचे राज्यपाल पद भूषवले.
राज्यपाल पदावरून निवृत्त झाल्यानंतर मलिक यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. (farmer protest support) शेतकरी आंदोलनाला त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला आणि सरकारच्या भूमिकेवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. याशिवाय २०२३ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत मलिक यांनी २०१९ मधील (Pulwama attack controversy)पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी हा हल्ला गंभीर गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे झाला असल्याचे सांगितले. सीआरपीएफने जवानांच्या हवाई प्रवासासाठी विमान मागितले होते.परंतु गृहमंत्रालयाने ती मागणी फेटाळल्याचा आरोप त्यांनी केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनएसए अजित डोभाल यांनी त्यांना या प्रकरणावर मौन बाळगण्यास सांगितल्याचा दावाही त्यांनी केला होता.