Home / News / Gold Rate-भारतीय बाजारात सोने लाखाच्या पार

Gold Rate-भारतीय बाजारात सोने लाखाच्या पार

मुंबई – इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम सोन्याच्या बाजार पेठेवरही दिसून येत आहेत. सराफा बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरांमध्ये आज...

By: Team Navakal
Gold Rate in India


मुंबई – इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम सोन्याच्या बाजार पेठेवरही दिसून येत आहेत. सराफा बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरांमध्ये आज मोठी वाढ झाली. सोन्याचा दर (Gold Rate in India) प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोने १,००,४०३ या उच्चांकी स्तरावर पोहोचला.

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला. ऑगस्ट फ्युचर्समध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव १,००,४०३ इतका नोंदवण्यात आला आहे. मनीकंट्रोल या वेबसाइटनुसार,२४ कॅरेट सोन्याच्या (24-carat gold) दरात एकाच सत्रात २,१२० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सराफा बाजारात त्याचा दर थेट १,००,४०३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या (1 gram of 22-carat gold) दरात १,९५० रुपयांची वाढ झाली असून सोने ९२,९५० रुपयांवर पोहोचले आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात १५९० रुपयांची वाढ झाली असून ७६,०५० रुपयांवर पोहोचलं आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये आज २४ कॅरेट सोन्याची किंमत १,०४,४००रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहचली आहे. चांदी १,०६,७९९ रुपये प्रति किलोग्रॅम उच्चांकी दरवाढीवर पोहोचली होती. काल चांदी १,०५,८८५ रुपयांवर स्थिरावली होती.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या