Home / News / गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ, जाणून घ्या आजचे दर

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price | गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2025) शुभ मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, यंदा गुढीपाडव्याच्या तोंडावर...

By: Team Navakal

Gold Silver Price | गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2025) शुभ मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, यंदा गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण असले तरी, वाढलेल्या भावामुळे ग्राहकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.  

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सातत्याने वाढ होत आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी (मार्च 29) सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ दिसून आली. 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 90,000 रुपयांवर पोहोचला, तर 1 किलो चांदीचा भाव 1 लाखाच्या पुढे गेला.  

बुलियन मार्केटनुसार, आज देशात 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 89,320 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 81,877 रुपये आहे. तसेच, 10 ग्रॅम चांदीचा भाव 1,008 रुपये आणि 1 किलो चांदीचा भाव 1,00,760 रुपये आहे. ही वाढ आदल्या दिवसाच्या तुलनेत लक्षणीय आहे.  

काही दिवसांपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली होती, त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र, गुढीपाडव्याच्या तोंडावर पुन्हा भाव वाढल्याने ग्राहक नाराज दिसत आहेत.

आज तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा भाव (Gold Silver Price Today) (प्रति 10 ग्रॅम):

शहर22 कॅरेट (रु.) 24 कॅरेट (रु.)
मुंबई81,730 89,160
पुणे 81,730 89,160
नागपूर 81,730 89,160
नाशिक 81,730 89,160

चांदीचा भावही मोठ्या प्रमाणात वाढला असून, आज तो प्रति किलो 1,04,000 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चांदी खरेदी करणे सर्वसामान्य ग्राहकांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. मार्च महिन्यापासून सोन्याने आपली चमक कायम ठेवली असून, पुढील महिन्यातही भाव वाढण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी सराफा बाजारात गर्दी दिसत असली तरी, वाढलेल्या भावामुळे खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या