Home / News / Grant Road Fish Sellers Allege : बिल्डरकडून गाळे हलविण्यासाठी दबाव ?ग्रँट रोडच्या मासे विक्रेत्यांचा आरोप

Grant Road Fish Sellers Allege : बिल्डरकडून गाळे हलविण्यासाठी दबाव ?ग्रँट रोडच्या मासे विक्रेत्यांचा आरोप

Grant Road Fish Sellers Allege – ग्रँट रोड येथील लोकमान्य टिळक मार्केटमध्ये मासे विक्री न करता अन्यत्र जाऊन मासे विक्री...

By: Team Navakal
Grant Road Fish Sellers Allege


Grant Road Fish Sellers Allege – ग्रँट रोड येथील लोकमान्य टिळक मार्केटमध्ये मासे विक्री न करता अन्यत्र जाऊन मासे विक्री करण्यासाठी एका बिल्डरकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृति समिती (एएमएमकेएस)ने केला आहे.

गाळे हलविण्यासाठी दबाव आणणा-या या बिल्डरवर कारवाईची मागणी या संघटनेने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना एका लेखी तक्रारीच्या माध्यमातून केली आहे.


हा पारंपारिक मासळी बाजार १९६० पासून ३०० हून अधिक. मच्छिमारांचे उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. मात्र, सध्या बाजारालगतचा एक भूखंड पुनर्विकासासाठी प्रस्तावित आहे. महापालिकेकडून कोणतीही औपचारिक परवानगी न घेता या विकासकाने बाजारातीलच एक गाळा भाड्याने घेतला आहे आणि त्यात खासगी कार्यालय सुरू करून विक्रेत्यांवर गाळे सोडून जाण्यासाठी अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे, असा आरोप या समितीचे सचिव पुनीत तांडेल यांनी केला.


पुनर्विकास प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणि न्याय आवश्यक आहे. विक्रेत्यांवर दबाव, धमकी किंवा एकतर्फी निर्णय आम्ही सहन करणार नाही. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर दिवाळीनंतर आम्ही रस्त्यावर उतरणार आणि मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारणार, असा इशारा या समितीच्या महिला विभागाच्या अध्यक्षा नयना पाटील यांनी दिला.


समितीचे सचिव तांडेल म्हणाले की, महानगरपालिका कायद्याच्या ९२ व्या कलमानुसार बाजारातील गाळे फक्त विक्री व व्यापारासाठी वापरले जाऊ शकतात. कार्यालयीन उपयोगासाठी त्यांचा वापर करणे हे अनधिकृत वापरबदल ठरते. बिल्डरच्या या दबाव तंत्रामुळे महिला विक्रेत्यांमध्ये भिती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

गगराणी यांना पाठविलेल्या निवेदनात समितीने विकासक विरोधात तत्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. भविष्यातील पुनर्विकास प्रक्रियेत परवानाधारक मासे विक्रेत्यांचा सक्रीय सहभाग असावा, त्यांना त्यांच्या जागेचा हक्क, उपजीविकेचे सातत्य, पुनर्वसन व नुकसानभरपाईची हमी मिळावी, अशी मागणी आम्ही केली आहे. महापालिकेच्या थेट देखरेखीखाली ही पुनर्विकासाची प्रक्रिया पार पडावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


हे देखील वाचा – 

महापालिकेतील बदली बढती घोटाळ्याची चौकशी करा! सुनील प्रभुंची मागणी

मेहुल चोक्सीला दिलासा नाही न्यायालयाने याचिका फेटाळली

आयुष – अ‍ॅलोपॅथी डॉक्टर समानता वरिष्ठ खंडपीठाकडे निर्णय वर्ग

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या