Gulabrao Patil’s Hema Malini Remark – राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त (Voter day)आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मतदानाचा अधिकार समजावताना त्यांनी अभिनेत्री व भाजपा खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांचा दुसऱ्यांदा उल्लेख करत केल्यामुळे चर्चा रंगली आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही. राजा आता मतपेटीतून जन्माला येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी टाटा-बिर्ला यांच्यासह सर्वसामान्यांनाही एक मताचा अधिकार दिला आहे. हेमा मालिनी यांनाही एकच मत आहे. यावेळी मंचावर उपस्थित शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांना उद्देशून मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी आहे असे समजा, असे वक्तव्य केले.
तीन वर्षांपूर्वीही गुलाबराव पाटील यांनी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत टिप्पणी करताना त्यांच्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून वाद झाल्यानंतर त्यांना २४ तासाच्या आत माफी मागावी लागली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
याच भाषणात त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. मुक्ताईनगरमध्ये खडसे यांनी आम्हाला त्रास दिला . जेलमध्ये टाकले. जिल्ह्यात सर्वांना त्रास दिल्याचे फळ आज त्यांना भोगावे लागत आहे.
दरम्यान, खासदार इम्तियाज जलील यांच्या महाराष्ट्र हिरवागार करू या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, कोणी म्हटल्याने महाराष्ट्र हिरवागार किंवा पिवळागार होत नसतो. अशा वक्तव्यांना अर्थ नाही. अशा विधानांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होऊ नये. तर उबाठा खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली. संजय राऊत यांना महाराष्ट्रातील राजकारणाची माहिती नाही. आमच्या पक्षाने या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी केली असल्याचा टोला त्यांनी लगावला.
हे देखील वाचा –
राज ठाकरेंचे खाजगी डॉ. यादव दादरला दवाखाना! प्रसिद्धीपासून दूर
पेंग्विन, ट्रम्प आणि ग्रीनलँड; मीम होतय व्हायरल..
वादग्रस्त विधानावरून एमआयएम नगरसेवक सहर शेख यांचा माफीनामा









