Hardeep Singh Puri Met Epstein 5–6 Times – एपस्टीन प्रकरणामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा गंभीर आरोप केला. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी जेफ्री एपस्टीनची ५ ते ६ वेळा भेट घेतल्याचा उल्लेख संबंधित फाईलमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,देशात राजकीय उलथापालथ होईल असा दावा मी कधीच केला नाही. ती फक्त शक्यता व्यक्त केली होती. एपस्टिन प्रकरणातील अनेक नवीन कागदपत्र समोर येऊ शकतात. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय राजकारणासोबतच भारतीय राजकारणावरही होऊ शकतो.
मराठी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते, ही शक्यता मी आधीही व्यक्त केली होती. पण ती व्यक्ती बारामती किंवा कराडमधली नसेल. ती मराठी व्यक्ती कोण असू शकते, हे राजकारणातील जाणकारांना माहिती आहे. पण देशाचे विद्यमान पंतप्रधान मात्र ‘ऑन बोर्ड’ आहेत. एपस्टिनच्या कागदपत्रातून ही बाब पुढे येत आहे.
या प्रकरणाशी संबंधित काही मेल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही नावाचा उल्लेख आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी हे न्यूयॉर्कमध्ये भारताचे राजदूत होते. त्यावेळी त्यांनी एपस्टीनची ५-६ वेळा भेट घेतल्याचा उल्लेख आहे.याचे उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे. अद्याप सर्व कागदपत्रे तपासलेली नाहीत. त्यामध्ये लक्षावधी फोटो, लक्षावधी कागदपत्रे आणि ई-मेल आहेत.
हे देखील वाचा-
हे देखील वाचा-
नवी मुंबई विमानतळाने घेतली पहिली व्यावसायिक उड्डाणाची झेप; भारतीय विमानवाहतूकीसाठी नवा अध्याय
नांदेडमध्ये चार जणांचा रहस्यमय मृत्यू; नांदेडमधील धक्कादायक घटना









