Home / News / Hardik Patel Warrant : हार्दिक पटेल सुनावणीला गैरहजर, अहमदाबाद कोर्टाचे वॉरंट जारी

Hardik Patel Warrant : हार्दिक पटेल सुनावणीला गैरहजर, अहमदाबाद कोर्टाचे वॉरंट जारी

Hardik Patel Absent from Hearing; Arrest Warrant Issued by Ahmedabad Court Hardik Patel Arrest Warrant – सन २०१८ मध्ये पाटीदार...

By: Team Navakal
Hardik Patel Arrest Warrant

Hardik Patel Absent from Hearing; Arrest Warrant Issued by Ahmedabad Court

Hardik Patel Arrest Warrant – सन २०१८ मध्ये पाटीदार समाजाला (Patidar Samaj) आरक्षण देण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनप्रकरणी पाटीदार समाजाचे नेते आणि भाजपाचे (BJP MLA)आमदार हार्दिक पटेल (Hardik Patel )यांच्याविरुद्ध अहमदाबाद ग्रामीण न्यायालयाने (Ahmedabad Court)अटक वॉरंट जारी केले (Arrest Warrant) आहे.
हार्दिक पटेल या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात वारंवार गैरहजर राहिले होते. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ते पुन्हा गैरहजर राहिले. त्या दिवशी ते गुजरात विधानसभे प्रश्नोत्तराच्या तासांत प्रश्न उपस्थित करताना दिसून आले. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले.
२०१८ मध्ये हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली पाटीदार अनामत आंदोलन समितीने अहमदाबादमधील निकोल परिसरातआंदोलन केले होते . त्या संबंधी हा खटला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पटेल आणि समितीच्या अन्य नेत्यांविरुद्ध बेकायदेशीरपणे जमाव जमवणे, दंगल घडवून आणणे, गुन्हेगारी स्वरुपाचा कट आखणे, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे आणि धमकावणे असे गुन्हे दाखल केले आहेत. पाटीदार समाजाला आरक्षण देणे आणि शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ करणे या दोन प्रमुख मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यादरम्यान आंदोलकांनी पोलिसांची परवानगी नसताना मोठा मोर्चा काढला होता.पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करताच आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ करत धमकावले,असा पोलिसांचा आरोप आहे.


हे देखील वाचा – 

सामन्याला चाहत्यांचा थंड प्रतिसाद! तिकिटांची विक्रीच झाली नाही; कारण काय?

एलफिन्स्टन पूल पाडू देणार नाही ! स्थानिक रहिवाशांचा विरोध कायम

पंतप्रधान उद्या पहिल्यांदाच मणिपूर दौऱ्यावर ! हिंसा सुरूच

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या