Home / News / Harish Rana Admitted to AIIMS : १३ वर्षे कोमात असलेल्या हरीश राणा एम्समध्ये दाखल ; इच्छामृत्यू प्रक्रियेची सुरुवात ; व्हिडिओ व्हायरल

Harish Rana Admitted to AIIMS : १३ वर्षे कोमात असलेल्या हरीश राणा एम्समध्ये दाखल ; इच्छामृत्यू प्रक्रियेची सुरुवात ; व्हिडिओ व्हायरल

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)इच्छामृत्यूची (Euthanasia) परवानगी दिल्यानंतर गाझियाबाद येथील १३ वर्षांपासून कोमात असलेल्या हरीश राणा (Harish Rana ) यांच्या अखेरच्या...

By: Team Navakal
Harish Rana Admitted to AIIMS
Social + WhatsApp CTA

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)इच्छामृत्यूची (Euthanasia) परवानगी दिल्यानंतर गाझियाबाद येथील १३ वर्षांपासून कोमात असलेल्या हरीश राणा (Harish Rana ) यांच्या अखेरच्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. कुटुंबीयांनी अत्यंत गुप्ततेने त्यांना दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात हलवले. यावेळी आई, बहीण आणि भावाला अश्रू अनावर झाले. हरीश राणा यांचा एक शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला त्यांना सर्वांची माफी मागत आणि सर्वांना माफ करत शांतपणे पुढे जाण्याचा संदेश देताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमधील (Ghaziabad)भाड्याच्या फ्लॅटमधून हरीश राणा यांना खासगी वाहनातून दिल्लीतील एम्समध्ये नेण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेबाबत शेजारी किंवा सोसायटीतील सदस्यांनाही माहिती देण्यात आली नव्हती. शनिवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता.

आई, बहीण आणि भावाला अश्रू अनावर

हरीश राणा यांना गाझियाबादमधील भाड्याच्या फ्लॅटमधून दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले, त्या वेळी आई, धाकटा भाऊ आणि बहीण भावुक झाले. एम्समध्ये हलवल्यानंतर बहीण संध्याकाळी उशिरा फ्लॅटवर परतली, तर भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, एम्समधील एक व्हिडिओही समोर आला आहे. संपूर्ण वैद्यकीय प्रक्रियेनंतर हरीश राणा यांची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून टाकण्यात येणार असून त्यानंतर इच्छामृत्यूची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. गेल्या १३ वर्षांपासून हरीश यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

हरीश राणा कोण होता?

३१ वर्षीय हरीश राणा हा पंजाब विद्यापीठातील विद्यार्थी होता. २०१३ मध्ये तो एका पीजी (PG) इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला. या अपघातात त्याच्या मेंदूला अत्यंत गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तो ‘व्हेजिटेटिव्ह स्टेट’मध्ये गेला आणि गेल्या १३ वर्षांपासून अंथरुणावर खिळून होता.

श्वासोच्छ्वासासाठी त्याच्या गळ्याला ट्रॅकिओस्टॉमी (tracheostomy) नळी लावण्यात आली होती, तर अन्न देण्यासाठी पोटात गॅस्ट्रोजेजुनोस्टॉमी (gastrojejunostomy) नळी बसवण्यात आली होती. मात्र, या दीर्घ काळात त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.

१३ वर्षे कोमात असलेल्या तरुणाला इच्छामृत्यूची परवानगी

सर्वोच्च न्यायालयाने १३ वर्षांपासून कोमात असलेल्या गाझियाबाद येथील हरीश राणा यांना पॅसिव्ह इच्छामृत्यूची परवानगी दिली आहे. देशातील अशा प्रकारची ही दुर्मीळ घटना मानली जात आहे.

हरीश राणा हे चंदीगडच्या पंजाब विद्यापीठात बीटेकचे शिक्षण घेत होते. २०१३ मध्ये वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि ते कोमात गेले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.

मुलाच्या असाध्य स्थितीमुळे त्यांच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने एम्स रुग्णालयाला हरीश राणा यांना पॅलिअटिव्ह केअरमध्ये दाखल करून टप्प्याटप्प्याने जीवनरक्षक उपचार काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

ब्रह्माकुमारींशी संबंधित राणा कुटुंब

ब्रह्माकुमारी (Brahma Kumari)संस्थेशी संबंधित राणा कुटुंबाने आपल्या दुःखाची कहाणी संस्थेतील दीदींना सांगितली होती. त्यानंतर त्यांच्या मदतीने वकिलांची व्यवस्था करण्यात आली. राणा कुटुंबीयांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती मंजूर करत हरीशवर मोठा उपकार केला. “आम्ही त्याचे दुःख सहन करू शकत नाही. त्याला नेमका किती त्रास होत आहे हेही आम्हाला समजत नाही, ही आमची असहाय्यता (helplessness,) आहे,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, दीदी हरीशजवळ पोहोचल्यावर त्यांनी त्याला, “सबको माफ करते हुए और सबसे माफी मांगते हुए अब जाओ, ठीक है,” असे सांगितल्याचे कुटुंबीयांनी नमूद केले. त्या वेळी हरीश डोळ्यांची उघडझाप करत शांतपणे पाहत होता. हा क्षण पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आले.

हरीश राणा यांना गाझियाबादमधील भाड्याच्या फ्लॅटमधून दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवताना आई, धाकटा भाऊ आणि बहीण भावुक झाले. हरीशचे वडील अशोक राणा म्हणाले, आम्ही सर्वांची माफी मागतो. देवाने आम्हाला या प्रसंगाचे साक्षीदार बनवले आहे. आमचा मुलगा कुठेही असो, आम्ही त्याला कधीही विसरणार नाही. आमचे नातेवाईक, डॉक्टर, न्यायालयात आमचे प्रतिनिधित्व करणारे वकील आणि इतर अनेकांनी आम्हाला मोठा पाठिंबा दिला. त्यांच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत.

एम्समध्ये हलवल्यानंतर बहीण संध्याकाळी उशिरा फ्लॅटवर परतली, तर कुटुंबातील इतर सदस्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, एम्समधील एक व्हिडिओही समोर आला आहे. वैद्यकीय प्रक्रियेनंतर हरीश राणा यांची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून टाकली जाणार असून त्यानंतर इच्छामृत्यूची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. गेल्या १३ वर्षांपासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

वडील अशोक राणा यांची भावनिक प्रतिक्रिया

हरीश राणा यांचे वडील अशोक राणा म्हणाले, “तो आमचा मुलगा आहे आणि आम्ही आतापर्यंत त्याची काळजी घेत आलो आहोत. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आम्ही ते करत राहू. न्यायालयाच्या निर्णयानंतर एम्सने आवश्यक सर्व तयारी केली आहे. आम्हाला याला ‘पॅसिव्ह इच्छामृत्यू’ असेही म्हणायचे नाही. आम्ही त्याला देवाच्या स्वाधीन करत आहोत.”

ते पुढे म्हणाले, “आम्ही त्याला अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली सोपवत आहोत. त्याला कोणतेही प्राणघातक इंजेक्शन दिले जाणार नाही. डॉक्टर फक्त अन्नपुरवठा करणारी नळी काढून टाकतील आणि नैसर्गिक मृत्यूची प्रक्रिया सुरू होईल. मात्र आम्ही त्याला पाणी देत राहू. संपूर्ण प्रक्रियेनंतर त्याची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून टाकली जाईल.”

अशोक राणा यांनी सांगितले की, गेल्या १३ वर्षांत हरीशच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. “जेव्हा हरीशचे निधन होईल, तेव्हा आम्ही त्याला घरी आणून अंतिम निरोप देऊ. एकच दुःख आहे की त्याने आपले दुःख कधी व्यक्तही करू शकले नाही,” असे त्यांनी भावुक होऊन सांगितले.

ते पुढे म्हणाले, “दररोज सकाळी आणि संध्याकाळी मी त्याला मालिश करत असे आणि घरातील घडामोडी सांगत असे. कधी कधी तो फक्त एकदाच डोळे मिचकावत असे आणि मला वाटायचे की तो सर्व काही ऐकत आहे. कधी तो जांभई देत असे, कधी शिंकत असे किंवा डोळ्यांभोवतीची त्वचा हलत असे. ते पाहून तो जिवंत असल्याची जाणीव आम्हाला दिलासा देत असे.”

राणा कुटुंबाने आपल्या कठीण काळात साथ दिलेल्या नातेवाईक, डॉक्टर, वकील आणि इतर सर्वांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, सुरुवातीला उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती मंजूर केली, ही हरीशसाठी मोठी दिलासा देणारी बाब ठरली. “आम्ही त्याचे दुःख सहन करू शकत नाही. त्याला नेमका किती त्रास होत आहे हेही आम्हाला समजत नाही, ही आमची असहाय्यता आहे, असेही त्यांनी नमूद केले.


हे देखील वाचा –

नवाकाळचे अचूक विश्लेषण; इराण-इस्रायल संघर्षाचा महाराष्ट्राला फटका; LPG-इंडक्शननंतर पीएनजीवरही येणार ताण? पुढचे संकट पाईप गॅसचे?

 उन्हाळा सुरू! थंड हवेच्या ठिकाणांचा शोध घेताय? भारतातील या 5 सर्वोत्तम हिल स्टेशन्सला नक्की भेट द्या

 महापौर तावडें पुन्हा वादात; गाडीवर लाल दिवा; विरोधकांचा हल्लाबोल

Web Title:
संबंधित बातम्या