Home / News / फरार मेहुल चोक्सीची सुनावणी!बँकांच्या सहभागास परवानगी

फरार मेहुल चोक्सीची सुनावणी!बँकांच्या सहभागास परवानगी

Hearing on Fugitive Mehul Choksi! Banks Allowed to Participate

Hearing on Fugitive Mehul Choksi! Banks Allowed to Participate


मुंबई – कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करुन फरार झालेला(Fugitive businessman) हिरेव्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi)याच्या सुनावणी वेळी व्यवहाराशी संबंधित दोन्ही बँकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेष पीएमएलए (PMLA court)न्यायालयाने आयसीआयसी व पंजाब नॅशनल बँक (PNB scam)या दोन्ही बँकांना या सुनावणीत सहभागी होण्याची परवानगी दिली.(Choksi extradition case)
या दोन्ही बँकांनी पक्षकार होऊन आपले म्हणणे मांडण्याची परवानगी देण्यात आली असून या दोन्ही बँकांनी आरोपीकडून जीएसटीची रक्कम येणे बाकी असल्याचे म्हटले आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना सुनावणी दरम्यान उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहे. या दोन्ही बँकांनी चोक्सीच्या जप्त केलेल्या मालमत्तेच्या विक्रीतून आपली फसवणूक झालेली रक्कम मिळवण्यासाठीची विनंती एका वेगळ्या अर्जाद्वारे केली होती. राज्याच्या कर विभागाच्या आयुक्तांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. त्यांनी म्हटले होते की, या बँकांना अशी मागणी करण्याचा अधिकार नाही. राज्य कर विभागाचे आयुक्त व बँका या मालमत्तेच्या रकमेची मागणी करत असल्यामुळे दोघांचेही म्हणणे ऐकून घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे या बँकांनाही परवानगी देण्यात आली आहे.