Raja & Sonam राजाची हत्या मीच केली! सोनमची कबुली

Raja & Sonam - I killed Raja! Sonam's confession


इंदुर – देशभर गाजलेल्या Indore इंदुरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील राजा रघुवंशी याची आपणच हत्या केल्याची कबुली पत्नी सोनमने दिली आहे. आज मेघालय मधील पोलीस अधिकाऱ्यांसमोर तिने ही कबुली दिली. आपण योजनाबध्द रितीने त्याचा काटा काढल्याचे तिने पोलिसांनी सांगितले. wife killed husband


मेघालय पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून या मोहिमेला त्यांनी Opration honeymoon ऑपरेशन हनीमून असे नाव दिले आहे. पोलिसांनी म्हटले की, सोनमने राजाला मारण्यासाठी शिलॉंगला आणले. Raj Kushawah राज कुशवाहने सर्वांसाठी नवीन सिमकार्ड व फोनची व्यवस्था केली. राजाची हत्या केल्यानंतर सर्व आरोपी रेल्वेने इंदुरला आले. त्यांनी बिहारमध्ये आपापले मोबाईल फोन तोडून फेकून दिले. त्यानंतर सिमकार्ड चावून नष्ट केले. पोलिसांसमोर या हत्येचा सर्व घटनाक्रम स्पष्ट झाला असून हत्येनंतर सोनम १७ दिवस कुठे राहिली व ती gazipur गाजीपूरच्या धाब्यावर कशी पोहोचली याचा अधिकृत उलगडा होणे बाकी आहे.

दरम्यान, सोनम व त्यांच्या कुटुंबियांनी राजा रघुवंशीचा मंत्रतंत्रासाठी बळी घेतला असावा अशी शक्यता राजा रघुवंशी याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. घराच्या दारावर मुलीचा फोटो उलटा टांगण्याचा प्रकारही याच तंत्रमंत्राचा भाग आहे. मंगळाचा दोष घालवायला तिने राजाशी विवाह करून त्याला ठार मारले . तिचे प्रेमप्रकरण तिच्या घरच्यांना माहीत असणार आहे . या प्रकरणात आणखी एका महिलेचा हात असून तिचा उलगडा लवकरच होईल. राजाचा भाऊ म्हणाला की , आमचे बहुतेक डोके फिरले होते , सोनमचे कुटुंब जे म्हणाले ते आम्ही करत गेलो . राजाची आई म्हणाली की कामाख्या देवीला जाण्याची कल्पनाही त्यांची होती. त्यानंतर गळ्यावर वार करुन बळी दिल्याप्रमाणे त्याची हत्या करण्यात आली. या विवाहाबाबत पत्रिका जुळवणारा इंदुरचा व्यक्तीही दोन दिवसांपासून फरार आहे. त्यानेच या विवाहाबद्दल भविष्यवाणी केली होती. सोनमच्या आईला आपली मुलगी असे काही करणार असल्याची माहिती असल्याचीही एक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. माझे जर राज कुशवाहशी लग्न झाले नाही तर तु पाहून घे मी काय करते, अशी धमकी सोनमने आपल्या आईला दिली होती अशी चर्चा आहे .

राजाच्या कुटुंबाला सोनमचा भाऊ भेटला sonam’s brother met raja’s family

सोनमचा भाऊ गोविंद याने आज राजाच्या आईची व कुटुंबियांची भेट घेतली व बहिणीच्या कृत्याबद्दल त्यांची क्षमा मागितली व तिला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी रघुवंशी कुटुंबियांना साथ देणार असल्याचे सांगितले. मात्र सोनम व राज कुशवाह यांचे प्रेमप्रकरण असेल ही शक्यता त्याने नाकारली आहे.