Illegal Arrest: ₹1 Lakh Fine – HC – दोन भागीदारांच्या वादातील प्रकरणात वांद्रे पोलिसांनी कर्नाटकातील एका व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक करून २० दिवस कोठडीत ठेवल्याबद्दल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्याचप्रमाणे संबंधीत पोलीस अधिकार्यांची विभागीय चौकशी करण्याचे आणि दंड रक्कम सहा आठवड्यांत देण्याचे आदेश दिले.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने सरकारवर ही दंडात्मक कारवाई केली आहे. न्यायालयाने दिलेल्या या सर्व निर्देशांचे पालन केल्याबद्दलचा अनुपालन अहवालही न्यायालयाने ४ डिसेंबरला सरकार व पोलिस आयुक्तांकडून मागितला आहे.
कर्नाटकातील वसंता नायक यांना वांद्रे पोलिसांनी कर्नाटकमधून २३ ऑक्टोबर २०२३ रोजी अटक केल्यानंतर त्यांना तेथील न्यायालयात हजर करून त्यांची दोन दिवसांची ट्रान्झिट कोठडी मिळवली. त्यानंतर मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून त्यांची कोठडी मिळवली.
अशाप्रकारे नायक यांना २० दिवस गजाआड ठेवले. त्यामुळे ही अटक कारवाई बेकायदा ठरवून संबंधित पोलिसांची चौकशी लावावी आणि भरपाईचा आदेश सरकारला द्यावा, अशा विनंतीची याचिका नायक यांनी ज्येष्ठ वकील आबाद पोंडा व अॅड. अनुकूल सेठ यांच्यामार्फत उच्च न्यायालयात केली होती.
या याचिकेच्या सुनावणीवेळी खंडपीठाने राज्य सरकारला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला. ही रक्कम सहा आठवड्यात याचिकाकर्त्याला देण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे या प्रकरणातील संबंधित पोलीस निरीक्षक प्रदीप केरकर आणि उपनिरीक्षक कपिल शिरसाठ यांनी मनमानी कारवाई केल्याचे निरीक्षण नोंदवत त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले.
या अधिकार्यांनी वरिष्ठांना माहिती न देता नायक यांच्याविरुद्ध कलम ४०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. नायक यांना अटक करण्यासाठी वरिष्ठांनीही कोणतेही तथ्य नसताना परवानगी दिली होती.
हे देखील वाचा –
रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवणं धक्कादायक; हरभजन सिंगने BCCI च्या निर्णयावर व्यक्त केले आश्चर्य
रोहित शर्माची कारकीर्द संपणार ? एक दिवसीय कप्तानपद नाकारले
महाराष्ट्रातील हॉटेल्स-रेस्टॉरंट्स आता 24 तास खुली राहणार; मात्र ‘या’ गोष्टींना परवानगी नाही









