Home / News / India Wins the Asia Cup – पाकिस्तान तिसऱ्यांदा चारीमुंड्या चीत भारतीय संघाने आशिया चषक जिंकला

India Wins the Asia Cup – पाकिस्तान तिसऱ्यांदा चारीमुंड्या चीत भारतीय संघाने आशिया चषक जिंकला

India Wins the Asia Cup – दुबई क्रिकेट मैदानावर (Dubai Cricket Stadium)आज रात्री झालेल्या आशिया क्रिकेट चषकाच्या महाअंतिम सामन्यात अपराजित...

By: Team Navakal
India Wins the Asia Cup


India Wins the Asia Cup – दुबई क्रिकेट मैदानावर (Dubai Cricket Stadium)आज रात्री झालेल्या आशिया क्रिकेट चषकाच्या महाअंतिम सामन्यात अपराजित भारतीय संघाने पाकिस्तानला 5 विकेटने (5 wicket) सलग तिसऱ्यांदा चारीमुंड्या चीत करून हा चषक जिंकला. पाकिस्तानने भारतापुढे विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य दिले.

या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. 3 बाद 20 धावा अशी अवस्था असताना तिलक वर्माने (Tilak Varma)(53 चेंडूंत 69 धावा)आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवत भारताला 2 चेंडू शिल्लक राखून विजय मिळवून दिला.  भारताने नवव्यांदा ही स्पर्धा जिंकली.  


भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात दुखापतीमुळे हार्दिक पांड्या खेळत नसल्याने शिवम दुबेने पहिले षटक टाकले. त्यात त्याने फक्त चार धावा दिल्या. त्यानंतर पाकिस्तानी सलामीवीर साहिबजादा फरहान आणि फखर झमान यांनी दुबे वगळता सर्व गोलंदाजांचा समाचार घेत चौकार आणि षटकार ठोकले.

त्यांनी पहिल्या विकेटसाठी 9.3  षटकांत 84 धावा ठोकल्या. साहिबजादा फरहान षटकार मारण्याच्या नादात वरुणच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. फरहानने 38 चेंडूंत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 57 धावा केल्या. सईम अयुब आणि फखर झमान यांनी धावाची गती कायम ठेवण्यात प्रयत्न केला. पाकिस्तानची धावसंख्या 12.5 षटकांत 1 बाद 113 अशी असताना सईम अयुब कुलदीपच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

त्यानंतर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मोहम्मद हरिस चुकीचा फटका मारत सीमारेषेवर झेलबाद झाला. त्याला साधा भोपळाही फोडता आला नाही. वरुणच्या 14व्या तिसऱ्या चेंडूंवर फखर झमानने गगनचुंबी षटकार मारला. त्यानंतर याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर तो मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाल्याने 200 धावांकडे वाटचाल करणाऱ्या पाकिस्तानाचा संघ दबावात आला.

वरुणच्याच गोलंदाजीवर हुसेनही एका धाव करून माघारी परतला. कुलदीपच्या 17 व्या षटकांत पाकिस्तानचे तीन बळी घेतले. त्यामुळे पाकिस्तानच्या धावगतीला ब्रेक लागला. कर्णधार सलमान आगालाही फारसे काही करता आले नाही. तो फक्त 8 धावा केल्या. शाहीन शाह आफ्रिदीला(0) कुलदीपने पायचीत पकडले.

त्यानंतर त्याच षटकात फहीम अशरफ (0) सीमारेषेवर झेलबाद झाला. जसप्रीत बुमराहने 17 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हरिस रौफचा त्रिफळा उडवला. एकामागून एक फलंदाज बाद झाल्याने पाकिस्तानची अवस्था 17.5 षटकांत 9 बाद 141 धावा अशी झाली. पाकिस्तानचा अखेरचा गडी मोहम्मद नवाज (6 धावा) डावाच्या शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्यामुळे पाकिस्तानला 19.1 षटकांत सर्वबाद 146 धावाच करता आल्या.


या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सलामीवीर अभिषेक माघारी परतला. तो फक्त 5 धावा करून तंबूत परतला. सूर्यकुमार यादवही फक्त 1 धाव करून तंबूत परतला. त्यानंतर 12 धावांवर खेळत असलेला शुभमन गिल चौकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था 4 षटकांत 3 बाद 20 अशी झाली.

या धोकादायक परिस्थितीत तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने डाव सावरला. सॅमसनचा 9 व्या षटकात पाकिस्तानी खेळाडूने झेल सोडला. दोघांनी धावसंख्या 12.2 षटकांत 77 वर नेली. संजू सॅमसन (21 चेंडूत 25 धावा) षटकार मारण्याच्या नादात झेलबाद झाला. भारताला विजयासाठी 36 चेंडूंत 64 धावांची आवश्यकता होती. तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी पाक गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला.

तिलक वर्माने अर्धशतक पूर्ण केले. 17 व्या षटकांच्या शेवटच्या चेंडूत शिवम दुबेने षटकार ठोकला. शेवटच्या 12 चेंडूंत 17 धावांची गरज असताना फहीम अशरफ गोलंदाजीला आला. त्याच्या 19 षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शिवम दुबे मोठ्या फटका मारताना सीमारेषेवर झेलबाद झाला. शेवटच्या 6 चेंडूवर भारताला 10 धावांची आवश्यकता होती. या षटकात तिलकने सणसणीत षटकार आणि रिकू सिंगने चौकार ठोकून भारताला 5 विकेटने दिमाखदार विजय मिळवून दिला.


हे देखील वाचा – 

शेतकरी संकटात! शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ‘या’ 5 महत्त्वाच्या मागण्या

अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशामुळे झाली? कारण आले समोर

पुण्यात भाजपा खासदारांनी गरबा कार्यक्रम बंद पडला

Web Title:
संबंधित बातम्या