जयपूर – राजस्थानच्या (Rajasthan) अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोटा (Kota) व बूंदी जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी वायुदलाने (Indian Air Force)एमआय १७ जातीचे हेलिकॉप्टर (Mi-17 helicopter)तैनात ठेवण्यात आले आहे. येथील अनेक भागात एनडीआरएफ (NDRF) व राज्य आपत्तीनिवारण दलाचे जवान (State Disaster Response Force teams)मदतकार्य करत आहेत. राजस्थानातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने रस्ते व रेल्वे वाहतूकही बाधीत झाली आहे.
राजस्थानमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट (Orange alert)देण्यात आला आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूर (Sawai Madhopur,), टोंक, कोटा, बूंदी, झालावाड, भीलवाडा, चित्तौडगड, डूंगरपूर व बांसवाडा जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोटा जिल्ह्यात कैथून धरनावदा राज्य महामार्ग बंद झाला आहे. येथील प्रताप चौक, इंद्रा मार्केट (Indra Market) व सदर बाजार (Sadar Bazaar)हे अडकलेल्यांसाठी अन्नाची पाकिटे टाकली जात आहेत. माधोपूर जिल्ह्यातील डूंगर भागात निगोह नदीला महापूर आला आहे. किरौली जिल्ह्यातील पांचना धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत.