India’s first hydrogen train to run soon.
नवी दिल्ली – भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन(India’s first hydrogen train)लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. (Hydrogen-powered train in India)सध्या चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीत (आयसीएफ) तिचे काम अंतिम टप्प्यात आहे. रेल्वेमंत्री (Indian Railways new projects)अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर या ट्रेनचा व्हिडिओ शेअर करत तिची पहिली झलक दाखवली. नमो ग्रीन रेल नावाची ही १२०० हॉर्सपॉवर क्षमतेची ट्रेन ताशी ११० किमी वेगाने धावणार असून, एकूण १० डब्ब्यांसह पुढे व मागे इंजिन असणार आहे. निळ्या रंगातील विशेष डिझाइनमुळे ती वेगळीच आकर्षक दिसते. (Hydrogen fuel train)या प्रकल्पाअंतर्गत १६०० हॉर्सपॉवरच्या दोन डबल इंजिनांचे रुपांतर १२०० हॉर्सपॉवरमध्ये करण्यात आले आहे. देशातील हायड्रोजन इंधनावर धावणारी ही पहिली ट्रेन हरयाणातील जींद–सोनीपत मार्गावर सुरू होणार आहे. प्रवाशांच्या क्षमतेएवढे वजन ठेवून तिची चाचणी केली जाणार आहे.(Eco-friendly trains India)
२०२३ साली राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांनी हायड्रोजन ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली होती. आता वंदे भारतनंतर मेक इन इंडियाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत, स्वच्छ इंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हायड्रोजनवर धावणारी ही हायस्पीड ट्रेन लवकरच ट्रॅकवर येणार आहे.