नवी दिल्ली– रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India)जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ११ जुलै रोजी संपलेल्या (ending July 11)आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा ३.०६४ अब्ज ( $3.64 billion)डॉलरने घसरून ६९६.६७२ अब्ज डॉलरवर आला. मागील आठवड्यात ३.०४९ अब्ज डॉलरची घट झाली होती,त्यावेळी परकीय चलन ( foreign exchange)साठा ६९९.७३६ अब्ज डॉलरवर होता, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात पुन्हा घसरण झाली आहे.
सप्टेंबर २०२४ अखेर परकीय चलन साठा ७०४.८८५ अब्ज डॉलरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. ११ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात विदेशी गंगाजळीचा एक प्रमुख घटक असलेली परकीय चलन मालमत्ता २.४७७ अब्ज डॉलरने घसरून ५८८.८१ अब्ज डॉलर झाली असे आकडेवारीत दिसून आले. तर सोन्याचा साठा ४९८ दशलक्ष (down by $498 million) अमेरिकन डॉलरने घसरून ८४.३४८ अब्ज अमेरिकन डॉलरवर आला आहे,असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.