SBI Report – चालू आर्थिक वर्ष (Financial year) आणि सन २०२६-२७ या (FY 2026-27) आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर रिझर्व्ह बँकेने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा खूपच असेल,असे भारतीय स्टेट बँकेने (State Bank of India) नुकत्याच प्रसिध्द केलेल्या अहवालात म्हटले आहे.
महागाईचा दर कमी राहण्यास देशांतर्गत विविध घटक साह्यभूत ठरतील. या घटकांमध्ये जीएसटीच्या दरांमध्ये (GST rates) करण्यात आलेले सुसुत्रीकरण हा मुख्य घटक ठरेल.त्याचबरोबर चांगला पाऊस, खरीपाची जास्त पेरणी, अन्नधान्याचा पुरेसा साठा आदि घटक महागाई कमी राखण्यास उपयुक्त ठरतील,असे एसबीआयने अहवालात म्हटले आहे.
वरील सर्व घटक लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने (RBI) काही दिवसांपूर्वी चालू आर्थिक वर्षामध्ये किरकोळ महागाईचा अंदाज ५० आधार बिंदुंनी (बेसीस पॉईंट) कमी करून २.६ टक्के केला आहे.रिझर्व्ह बँकेने चालू वर्षासाठी हा सुधारित अंदाज मांडताना जरी १६० आधार बिंदूंनी महागाई दर कमी असला तरी प्रत्यक्ष महागाई दर त्याहून कमीच असेल,असे एसबीआयचा अहवाल म्हणतो.
हे देखील वाचा –
5 वर्षांनंतर भारत-चीन थेट विमानसेवा पुन्हा सुरू! ‘या’ तारखेला IndiGo घेणार भरारी
दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा महिलांना मोठा शब्द; ‘लाडकी बहीण योजने’बद्दल म्हणाले…